Monday, September 21, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँक बिनविरोधसाठी एकत्र बसून फॉर्म्युला तयार करावा

Ahilyanagar : जिल्हा बँक बिनविरोधसाठी एकत्र बसून फॉर्म्युला तयार करावा

माजी पदाधिकारी, संचालक मंडळाची मागणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच गडद होताना दिसत आहे. परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरी अहिल्यानगर जिल्हा अद्याप तहानलेलाच आहे. आधीच खरीप हंगामाची वाट लागली असून आता रब्बी हंगामाचे चित्रदेखील धूसर झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात होऊ घातलेली जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा सभासदांसह बँकेचे माजी पदाधिकारी आणि ज्येष्ठ माजी संचालक यांच्याकडून व्यक्त होत आहे. बँक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील नेतेमंडळींनी एकत्र बसून शेतकरी आणि बँकहिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अनेकांनी ‘सार्वमत’ शी बोलताना व्यक्त केली.

- Advertisement -

मागील आठवड्यात जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीनुसार जिल्ह्यात सेवा सोसायटी, व्यक्तिगत मतदारसंघ, शेतीपूरक आणि बिगरशेती मतदारसंघातून एकूण 3 हजार 836 मतदार आहेत. जिल्हा बँकेने सहकार खात्याकडे पाठविलेल्या 5 हजार 800 हून अधिक मतदारांच्या यादीची छाननी करून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अंतिम मतदार यादी तयार केली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील पावसाची स्थिती भीषण आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांत आतापर्यंतच्या एकूण पावसाच्या सरासरीच्या 70 टक्क्यांच्या आतच पाऊस झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असून शेतकर्‍यांनी केलेला खर्च वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असला तरी शेतीसह पिण्याच्या पाण्याची गरज भागवित पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंतचे नियोजन आतापासूनच करण्याची वेळ आली आहे.

दुसरीकडे, जिल्ह्यातील शेतकर्‍यांची कामधेनू आणि कैवारी म्हणून जिल्हा बँकेची ओळख आहे. अडचणीच्या काळात जिल्हा बँक नेहमीच शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. आता पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत असून, शेतकर्‍यांची वसुली थकल्याने जिल्हा बँकेसमोरही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे बँकेचे जवळपास 50 टक्के कर्ज थकीत आहे. कर्जाची ही रक्कम साडेतीन हजार ते चार हजार कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. यासोबतच सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेच्या काळातील सव्वाशे कोटी रुपयांच्या व्याजाचा प्रश्नही बँकेसमोर आहे.

ताज्या बातम्या

ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून, परवान्यासाठी 127 कारखान्यांनी केले अर्ज

0
पुणे | Pune राज्यातील गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मंत्रिसमितीने नुकतीच मान्यता दिली आहे. साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामासाठी आतापर्यंत...