Tuesday, September 22, 2026
HomeनगरAhilyanagar : समृद्धी, एक्स्प्रेसवेवर 24 तास वॉच

Ahilyanagar : समृद्धी, एक्स्प्रेसवेवर 24 तास वॉच

महामार्गांवरील मृत्यूचे सापळे रोखण्यासाठी पोलीस 6 महिने तैनात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर सतत होणारे भीषण अपघात लेन कटिंग, अतिवेग आणि चालकांचा निष्काळजीपणा रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय झाला आहे. महामार्ग सुरक्षा पथकातील 1,101 कर्मचार्‍यांना पुढील 6 महिन्यांसाठी मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. ही मुदतवाढ केवळ कागदोपत्री प्रशासकीय प्रक्रिया नसून, राज्यातील महामार्गांवर प्रत्यक्ष अहिल्यानगरसह 25 हून अधिक जिल्ह्यांत पोलीस दल 24 तास सक्रिय ठेवण्याच्या दृष्टीने निर्णायक मानली जात आहे.

- Advertisement -

महामार्गांवर होणार्‍या अपघातांमध्ये अतिवेग आणि चुकीच्या पद्धतीने गाड्या ओव्हरटेक करणे (लेन कटिंग) ही मुख्य कारणे आहेत. या 1,101 पदांमध्ये केवळ अधिकारीच नव्हे, तर शेकडो हवालदार, पोलीस शिपाई आणि चालक यांचा समावेश आहे. यामुळे स्पीड गन आणि आधुनिक ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणेसह पोलीस पथके महामार्गांवर सातत्याने गस्त घालू शकतील. नाशिक-पुणे, मुंबई, नाशिक गुजरात, दिव-दमन या मार्गांसह खंडाळा, बोरघाट व अन्य धोकादायक वळणांवर अपघातांची शक्यता अधिक असते. त्यामुळे बोरघाट आणि चिंचोटी भागातील क्रेन चालक व तांत्रिक कर्मचार्‍यांच्या पदांचाही समावेश आहे.

त्यामुळे अपघात घडल्यास किंवा वाहन नादुरुस्त झाल्यास रस्ता मोकळा करण्यासाठी आणि जखमींना वेळेत वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी या पथकाचा थेट फायदा होणार आहे. सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांच्या कालावधीत गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि वर्षा अखेरच्या सुट्ट्या येतात. या काळात महामार्गांवरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढते. 1,101 कर्मचार्‍यांच्या या ताफ्यामुळे सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी नियंत्रण आणि सुरक्षेचे नियोजन अधिक सक्षमपणे करता येईल. जर ही मुदतवाढ वेळेत मिळाली नसती, तर महामार्गांवरील गस्त यंत्रणा आणि क्रेन सेवा ठप्प झाली असती. शासनाच्या या निर्णयामुळे आगामी सणासुदीच्या काळात महामार्गांवरील सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन अबाधित राहणार आहे.

अहिल्यानगरसह ग्रामीण भागातील महामार्गांवर गस्त
नाशिक (ग्रामीण), अहिल्यानगर, धुळे, जळगाव, पुणे (ग्रामीण), ठाणे आणि रायगड या महत्त्वाच्या जिल्ह्यांतील महामार्ग सुरक्षा केंद्रांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. नाशिक ग्रामीण अंतर्गत 109 पदे, पुणे ग्रामीण 115 पदे तर ठाणे ग्रामीण 171 पदे या निर्णयामुळे सक्रिय राहणार आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra News : राज्यातील ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली;...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या नावाखाली राज्यातील ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे...