Friday, May 3, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात 958 रुग्णांना डिस्चार्ज तर 445 करोना बाधितांची वाढ

नगर जिल्ह्यात 958 रुग्णांना डिस्चार्ज तर 445 करोना बाधितांची वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात आज 958 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 48 हजार 254 इतकी झाली आहे.

- Advertisement -

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 93.12 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 445 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2770 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 158, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 86 आणि अँटीजेन चाचणीत 201 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 40, अकोले 03, जामखेड 02, कर्जत 01, कोपरगाव 05, नगर ग्रामीण 18, नेवासा 06, पारनेर 11, पाथर्डी 04, राहाता 14, राहुरी 07, संगमनेर 19, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 18, कँटोन्मेंट 09 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 86 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 37, जामखेड 03, नगर ग्रामीण 13, पाथर्डी 06, राहुरी 04, शेवगाव 06, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 05, मिलिटरी हॉस्पिटल 06 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 201 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 16, अकोले 05, जामखेड 11, कर्जत 13, कोपरगाव 12, नेवासा 06, पारनेर 10, पाथर्डी 45, राहाता 14, राहुरी 06, संगमनेर 25, शेवगाव 22, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 12 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 183, अकोले 56, जामखेड 32, कर्जत 34, कोपरगाव 30, नगर ग्रा. 58, नेवासा 45, पारनेर 25, पाथर्डी 45, राहाता 82, राहुरी 72, संगमनेर 181, शेवगाव 18, श्रीगोंदा 29, श्रीरामपूर 48, कँटोन्मेंट 03, मिलिटरी हॉस्पिटल 16 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 48215

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 2770

* मृत्यू : 796

* एकूण रूग्ण संख्या : 51820

- Advertisment -

ताज्या बातम्या