Friday, May 3, 2024
Homeनगरशिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीत सत्तांतर

शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीत सत्तांतर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या (District Primary Teachers Bank) अध्यक्षा, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत (Election of President, Vice President) गुरूमाऊली मंडळाच्या (Gurumauli Mandal) तांबे गटाकडील (Tambe Group) सहा संचालक अचानक रोहकले गटाकडे (Rohokale group) (गेल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत सत्तांतर झाले. अध्यक्षपदाच्या निवडीत तांबे गटाचे उमेदवार किसन खेमनर (संगमनेर) (Kisan Khemnar) यांचा रोहकले गटाचे उमेदवार अविनाश निंभोरे (श्रीगोंदा) (Avinash Nimbhore) यांनी सहा मतांनी पराभव केला. तर तांबे गटाचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाराम गाडे (Gangaram Gade) हे बिनविरोध (Unopposed) झाले आहेत. या निवडीनंतर तांबे गटाने रोहकेले गटावर घोडेबाजार केल्याचा आरोप (Allegations) केला आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी बुधवारी (काल) संचालक मंडळाची सभा बोलविण्यात आली होती. या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर होते. बँकेच्या सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत राहेकले गटाचे आणि तांबे गटाचे संचालक उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बापूसाहेब तांबे गटाकडून खेमनर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर गुरूमाऊली मंडळाच्या रोहकले गटाकडून निंभोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या गुप्त मतदानात निंभोरे यांना 13 मते मिळाली तर सत्ताधारी तांबे गटाला अवघी 8 मते मिळाली.

या निवडणुकीत तांबे यांच्या बाजूची 6 मते फूटून रोहकले यांना मिळाल्याने निंभोरे यांचा विजय सुकर झाला. दरम्यान, उपाध्यक्षपदासाठीचे उमदेवार गंगाराम गोडे यांच्या विरोधात उमदेवारी अर्ज न आल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. यावेळी बँकेच्या संचालक सीमाताई क्षिरसागर, उषाताई बनकर, मंजुषाताई नरवडे, विद्युल्लताताई आढाव, संतोष अकोलकर, दिलीप औताडे, राजेंद्र मुंगसे, नानासाहेब बडाख, संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाठ, अनिल भवार, सलीमखान पठाण, सुयोग पवार, बाळासाहेब मुखेकर, बाबा खरात, राजू रहाणे, साहेबराव अनाप आदी उपस्थित होते.

दरम्यान, शिक्षक परिषदेचे नेते रावसाहेब रोहोकले, प्रवीण ठुबे, विकास डावखरे, संजय शिंदे, संजय शेळके, भाऊसाहेब ढोकरे यांनी तांबे गटाकडून सत्ता खेचून आणण्यात मोलाची भूमिका बजावली.

शिक्षक बँकेची निवडणूक व्हावी यासाठी कोर्टात जाणारे सत्तेसाठी किती हपापलेले होते, कालच्या पदाधिकारी निवडीच्या निवडणुकीतून दिसून आले. नूतन पदाधिकारी यांचे स्वागत आहे. लोकशाहीत झालेला पराभव मान्य आहे. मात्र, उठसूट बँकेवर आरोप करून समाजात शिक्षकांची प्रतिमा खराब करणार नाही. सत्तेसाठी बँकेवर खोटेनाटे आरोप करणार नाही.

– राजकूमार साळवे, अध्यक्ष गुरूमाऊली मंडळ (तांबे गट).

- Advertisment -

ताज्या बातम्या