Sunday, June 14, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत खंदेपालट

Ahilyanagar : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत खंदेपालट

चेअरमनपदी घुले तर, व्हाईस चेअरमनपदी कराड यांची निवड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत खंदेपालाट करण्यात आली आहे. बुधवारी (20 मे) बँकेच्या नूतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यात चेअरमनपदी संगमनेरच्या संचालिका सरस्वती घुले-सहाणे यांची तर व्हाईस चेअरमन पदी शिवाजी कराड यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या उपस्थिती या निवडी करण्यात आल्या.

- Advertisement -

दरम्यान, मावळते चेअरमन गोरक्षनाथ विटनोर व व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी राजीनामा दिल्याने सदर निवडी करण्यात आल्या. चेअरमन पदाची सूचना संदीप मोटे यांनी मांडली. अनुमोदन निर्गुणा बांगर-कापसे यांनी दिले. तर व्हाईस चेअरमन पदाची सूचना ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी मांडली तर अनुमोदन आण्णासाहेब आभाळे यांनी दिले. चेअरमन पदासाठी झालेल्या निवडणुकीत 17 विरूध्द 4 मतांनी घुले यांनी बाजी मारली. कराड यांची व्हॉईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. विद्युलता आढाव यांच्यासह गोकुळ कळमकर, शरद सुद्रिक, राजेंद्र ठोकळ, संदीप मोटे पाटील, संचालक कल्याण लवांडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी दत्ता पाटील कुलट, राजेंद्र सदगीर, अर्जुन शिरसाठ, बाबासाहेब खरात, रविकिरण साळवे, बबन गाडेकर, संतोष दुसुंगे, संतोष भोपे, रमेश दरेकर, विजय ठाणगे, पी. डी. सोनवणे, नारायण पिसे, आबासाहेब दळवी, राजेंद्र ठोकळ, प्रवीण झावरे, राजेंद्र निमसे, साहेबराव अनाप, बाळासाहेब कापसे, भास्करराव कराळे, प्रल्हाद भालेकर, सुयोग पवार, संतोष मगर, संभाजी आढाव, बाळासाहेब चाबूकस्वार, बाबाजी डुकरे पाटील, कैलास सहाणे, सुनील ढेरंगे, विठ्ठलराव काकडे, विठ्ठलराव काळे, सचिन नाबगे, सरसराम तांबे, चंद्रकांत नरसाळे आदींसह संघ व मंडळाचे तालुकाध्यक्षांसह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

मावळते चेअरमन विटनोर यांनी सर्वांचे आभार मानले. संचालक रामेश्वर चोपडे, बाळासाहेब तापकीर, योगेश वाघमारे, कारभारी बाबर, कैलास सारोक्ते, शशिकांत जेजुरकर, माणिक कदम, महेश भनभणे आदींसह मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा संघाचे सरचिटणीस प्रकाश नांगरे यांनी केले.

विरोधकाला पद आणि निष्ठावंतांना ठेंगा
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक खर्च करणार्‍या आणि नेत्यांचा प्रत्येक शब्द उचलून धरणार्‍या त्या संचालकाच्या पदरी या पदाधिकारी निवडीत देखील निराशाच हाती आली आहे. यंदाच्या निवडीत विरोधी मंडळातून विजय झालेल्या संचालकाला संधी देण्यात आली असून निष्ठावंत यांना डावलण्यात आल्याची खंत काही शिक्षक नेत्यांनी व्यक्त केली.

फुटलेले ते चार संचालक कोण
शिक्षक बँकेच्या सत्ताधारी गुरूमाऊली मंडळात यापूर्वी झालेल्या पदाधिकारी निवडीत संचालकांमध्ये त्यावेळी संपूर्ण काही नेत्यांच्या मदतीने शिक्षक बँकेची सत्ता काबीज केली होती. त्यानंतर वर्षभरात गुरूमाऊली मंडळाने कशीबशी आपली सत्ता पुन्हा हस्तगत केली होती, मात्र काल झालेल्या संचालक मंडळाच्या निवडीत सत्ताधारी गुरूमाऊली मंडळाचे चार संचालक पुन्हा फुटले असून फुटलेले ते संचालक कोण याबद्दल जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

महिला टी-20 विश्वचषक २०२६ : भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय

0
महिला टी-20 विश्वचषक २०२६ मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६४ धावांनी शानदार विजय मिळवत स्पर्धेतील मोहिमेची दमदार सुरुवात केली. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर झालेल्या या...