नाशिक | प्रतिनिधी | Nashik
प्रत्येक अधिकाऱ्यांना, सर्व विभागांचे, सर्व नियोजन ज्ञात व्हावे, या उद्देशाने शहर परिसरात उपलब्ध असणाऱ्या सर्व सवा सुविधांचे जिओग्राफिकल इन्फोर्मेशन सिस्टम (जीआयएस) द्वारे मॅपिंग करुन ती एकत्रीत माहिती एका क्लिकवर उपलब्ध करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr.Praveen Gedam) यांनी दिले. यात प्रामुख्याने जवळचे रुग्णालय इतर अत्यावश्यक सुविधा पटकन उपलब्ध करता येणार असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) अनुषंगाने सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आढावा बैठक संपन्न झाली. बहुतांश सर्वच विभागांनी आपली आराखडे सादर केले आहे. त्यात प्रस्तावित असलेल्या सेवासुविधा आणि नव्याने संकल्पित केलेल्या सुविधांचे स्थान ‘जीआयएस मॅपिंग’ द्वारे स्थान उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे डॉ. गेडाम म्हणाले.
साडेतीनशे ते पाचशे एकर जागेची गरज
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने साधूग्राम तपोवनसाठी ३५० ते ५०० एकरच्या दरम्यान जागा व अपेक्षित आहे. यात ही जागा खरेदी करावी की, भाडेतत्वावर ध्यावी याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे सांगितले, प्रत्यक्षात या जागांचा वापर सिंहस्थानंतरच्या अकरा वर्षे मनपा प्रशासनाला उत्पन्नासाठी होऊ शकतो कां? याचा विचार करण्यासाठी विविध विभागांना जाहिरात देऊन नवीन संकल्पना सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले. त्याभूखंडापासून अकरा वर्षे जर उत्पन्न मिळणार असेल तर जागा खरेदी करणे योग्य राहील अन्यथा एक वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेऊन सिंहस्थ पूर्ण करता येईल असाही मत प्रवाह असल्याचे डॉ. गेडाम यानी सांगितले.
त्र्यंबकेश्वरसाठी मार्गांचा आढावा
भाविकांना त्र्यंबकेश्वरहून (Trimbakeshwar) परभणीला जाण्यासाठी नाशिकमधून जाण्याचे मार्ग व नाशिकला बायपास करून जाण्याचे मार्ग यांचा आढावा सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी सविस्तर माहिती सादर केली.
रामकाल पथवर काम सुरु
पंचवटीतील प्रभू रामांच्या वास्तव्याच्या पाऊल खुणा विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा रामकाल पथ विकसित करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यावर प्रशासकीय काम गतिमान झाले असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
सीसीटीव्हींचा आढावा
शहरात उपलब्ध असलेली सीसीटीव्ही आणि पोलीस प्रशासनाने नोंदवलेली गरज यांचे नियोजन यावेळी जाणून घेतले आणि त्यात स्मार्टसिटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेली आणी त्यात काय वाढ केली आहे, याबद्दलची सविस्तर माहिती यावेळी सादर करण्यात आली. त्यासोबतच पार्किंग, रोडप्लॅन याचीही सविस्तर माहिती जाणून घेतली.