Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedविज्ञान

विज्ञान

वैष्णवी धर्मराज कदम

मेंडलच्या गृहितकांनी आम्हाला

- Advertisement -

वारसाहक्काची जाणीव करून दिली ॥

एडिसनच्या बल्ब मध्ये

आमची स्वप्नं उजळू लागली ॥

एकविसाव्या शतकातील आम्ही

आता विज्ञानाची कास धरली ॥1॥

न्यूटन आमचा देव झाला

गती त्याने आयुष्याला दिली ॥

ग्राहम बेलच्या फोन ने

आम्हां मनाची अंतरे दूर केली ॥

एकविसाव्या शतकातील आम्ही

आता विज्ञानाची कास धरली ॥2॥

मिसाईल मॅन ने

उडण्या पंख आम्हां दिली ॥

अशुभ शनि, वक्र नजर मंगळची

आता यांची बाधा टळली ॥

एकविसाव्या शतकातील आम्ही

आता विज्ञानाची कास धरली ॥3॥

बैबेजने आम्हां…

जग संगणकाचे दाखवले ॥

इन वन टच मध्ये लॅरी पेज ने,

जग हातात आणून दिले ॥

एकविसाव्या शतकातील आम्ही

आता विज्ञानाची कास धरली ॥4॥

विज्ञान प्रगतीचे साधन आहे

ही गोष्ट मनास पटली ॥

अंधश्रद्धेचे बांधून गाठोडे,

आम्ही मनातून फेकली ॥

एकविसाव्या शतकातील आम्ही

आता विज्ञानाची कास धरली ॥5॥

कु. वैष्णवी धर्मराज कदम

खारीपाडा ता.देवळा जि.नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या