Friday, May 3, 2024
Homeजळगावसमाजकार्य महाविद्यालय कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात!

समाजकार्य महाविद्यालय कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील समाजकार्य महाविद्यालयातील (College of Social Work) प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे (faculty and non-teaching staff) नियमित वेतन (regular salary) माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर आणि ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर असे दिले जाते. शासनाने दिवाळीच्या आधी वेतन देण्याची घोषणा (Declaration) केली आहे. मात्र, आजपोवेतो वेतनहेडवर (payroll) अनुदान प्राप्त झालेले (Grant not received) नाही. त्यामुळे प्राध्यापकांसह शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची (employees) दिवाळी अंधारात (Diwali in the dark) जाण्याची शक्यता बळावली आहे.

- Advertisement -

सामाजिक न्याय जळगाव विभागातील समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे नियमित वेतन माहे सप्टेंबर पेड ईन ऑक्टोबर आणि ऑक्टोबर पेड ईन नोव्हेंबर हा दिवाळीच्या आधी मिळणारे वेतनासाठी आजपोवेतो वेतनहेडवर अनुदान प्राप्त झालेले नाही.

दि.21 ऑक्टोबरपासून दीपोत्सवास प्रारंभ झाला आहे. तरीही दिवाळी सणाआधीच वेतन करणे ही शासनाकडून शुध्द धूळफेक झाली आहे. आरोग्य, शिक्षण, जिल्हा परिषद, महसूल, नगरपालिका, पोलीस आदींचे वेतन होण्यासाठी अद्यापपर्यंत आर्थिक तरतूद झालेली नाही. आर्थिक तरतूद आज झाली तरी जिल्हास्तरावर येईपर्यंत ट्रेझरी, बँक, विविध कार्यालये यांना सुटी असल्याने दिवाळी कडूच होणार आहे.

शासन केवळ पत्र काढून प्रसिध्दी आणि सहानुभूती मिळवून घेत आहे. प्रत्यक्ष समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे दिवाळी आधी वेतन होणार नाही हे सुध्दा अधिकारी आणि शासनाला माहिती आहे.

प्रा. डॉ. निलेश चौधरी, खजिनदार,एन मुक्टो

- Advertisment -

ताज्या बातम्या