Monday, May 20, 2024
Homeजळगावदीपनगर प्रकल्पातील कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड

दीपनगर प्रकल्पातील कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

दीपनगर प्रकल्पातील (Deepnagar project) कर्मचार्‍यांना (employees) दीपावली पूर्वीच सानुग्रह अनुदान (Diwali Sanugrah Grant) जाहीर करण्याची भुमिका महाजेनकोने घेतली होती. तत्यानुसार महाजेनकोने (Mahajenko) दीपावलीपूर्वीच 20 रोजी सानुग्रह अनुदानाची घोषणा (Declaration) केल्याने प्रकल्पातील तब्बल 1100 कर्मचार्‍यांना लाभ (Employee benefits) मिळणार असल्याने कर्मचार्‍यांंंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील संघर्ष समितीने दीपावली पूर्व सानुग्रह न मिळाल्यास आंदोलनाची नोटीस महाजनको प्रशासनाला जारी केली होती.

- Advertisement -

दीपावली पूर्वीच महाजनकोने कर्मचार्‍यांना 16 हजार रुपयांचा सानुग्रह मंजुर केल्यामुळे कर्मचार्‍यांची दीपावली आनंदात साजरी होणार आहे. दीपनगर केंद्रातील 950 कर्मचार्‍यांना 16 हजार तर साधारण 150-200 मानधनतत्वावरील कर्मचार्‍यांना 10 हजारांचा सनुग्रह मिळणार आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली दीपावली निर्बंधात साजरी करण्यात आली होती. तब्बल दोन वर्षांनंतरा सर्वांमध्ये दीपावलीपबाबत उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी ही होत आहे. अशा काळात महाजनकोच्या कर्मचार्‍यांना 16 हजार रुपयांचा सनुग्रह अनुदान मिळाल्याने त्यांची दीपावली गोड होणार आहे.

याबाबतऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे व तिन्ही कंपन्यातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना प्रकाशगड (बांद्रा) येथे 17 रोजी संघर्ष समितीमध्ये सहभागी 26 कामगार, अभियंते व अधिकारी यांच्या संघटना पदाधिकारी यांची बैठक झाली.

त्याच दिवशी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक (वित्त) रविंद्र सावंत यांची भेट घेऊन संघटनांच्या संतप्त भावना उर्जा सचिवांपर्यंत पोहोचवावे ही मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली होती. त्यांनी तात्काळ संचालक मानव संसाधन वितरण कंपनी यांच्या मार्फत संघटनांच्या भावना प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्यापुढे मांडल्या होत्या. संघर्ष समितीमध्ये सहभागी सर्वच संघटनांचे नेतृत्वाने 25 हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे ही आग्रही मागणी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या