Monday, September 14, 2026
Homeक्राईमCrime News : डीजेच्या स्टेटसवरून दोन गटांत राडा

Crime News : डीजेच्या स्टेटसवरून दोन गटांत राडा

53 जणांवर गुन्हे, आठ महिलांचा समावेश

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पोळा सणानिमित्त लावलेल्या डीजेच्या समाजमाध्यमावरील स्टेटसवरून सोमठाणे नलवडे (ता. पाथर्डी) येथे दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल असून, एकूण 53 जणांसह काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. यात आठ महिलांचा समावेश असून, काही जण जखमी झाले आहेत. 10 सप्टेंबरला पोळ्यानिमित्त डीजे व मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर डीजे व मिरवणुकीबाबत समाजमाध्यमावर स्टेटस ठेवल्याने वाद झाला.

- Advertisement -

दुसर्‍या दिवशी वाद मिटविण्याचा प्रयत्न झाला; मात्र मंदिराजवळ व झोपडपट्टी परिसरातील रस्त्यावर दोन्ही गट आमनेसामने येऊन हाणामारी झाली. रामदास शंकर काकडे यांच्या फिर्यादीनुसार, ते काही प्रतिष्ठित नागरिकांसोबत स्टेटसबाबत चर्चा करीत असताना वाद मिटवून संबंधित पोस्ट हटविण्यात आली. त्यानंतर संतोष मधुकर दौंडे, सतीश मधुकर दौडे, अरुण भास्कर दौडे यांच्यासह 26 जण व अनोळखी व्यक्तींनी जमाव करून शिवीगाळ केली. काठ्या, लोखंडी गज व दगडांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांना फोन केल्यानंतर जमाव निघून गेला. गुन्हा दाखल केल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. सुनील विनायक दौंडी यांच्या फिर्यादीनुसार, 10 सप्टेंबरच्या रात्री डीजे सुरू असताना रामदास शंकर काकडे यांनी डीजे बंद करण्यास सांगितल्याने शाब्दिक वाद झाला. दुसर्‍या दिवशी सुनील दौंडे व कुटुंबीय रस्त्यावर उभे असताना रामदास काकडे, आजिनाथ नलवडे, रामा काकडे यांच्यासह 27 जणांनी समाजमाध्यमावरील स्टेटसच्या कारणावरून लाकडी दांडे, दगड व प्लास्टिकच्या पाइपने मारहाण केल्याचा आरोप आहे.

यात सुनील दौंडे, त्यांचे वडील व चुलते जखमी झाले. पुन्हा गावात दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. जखमींना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन्ही फिर्यादींवरून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, एकूण 53 आरोपींमध्ये आठ महिलांचा समावेश आहे. घटनेनंतर गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून 3147 क्युसेकने विसर्ग सुरू

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा पाणलोटात शनिवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाल्याने काल सायंकाळी 11039 क्षमतेच्या धरणातून 3147 क्युसेकने विसर्ग...