Friday, May 3, 2024
Homeजळगावक्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावल्याने डी.जे.पी. कारगावकर यांनी केले मुक्ताईनगर पोलिसांचे...

क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावल्याने डी.जे.पी. कारगावकर यांनी केले मुक्ताईनगर पोलिसांचे कौतुक

मुक्ताईनगर Muktainagar (वार्ताहर) –

तालुक्यात घडलेल्या खून व घरफोडी अशा क्लिष्ट गुन्ह्यांचा complex crimes Investigation तपास अवघ्या कमी कालावधीत लावल्याने मुक्ताईनगर पोलिसांचा Muktainagar police डीजे पी विनय कारगांवकरDJP Vinay Kargaonkar , आय जी पी शेखर पाटील IGP Shekhar Patil तसेच जळगाव जिल्ह्याचे एस पी डॉक्टर प्रवीण मुंडे SP Dr. Praveen Munde यांच्यातर्फे कौतुक करून गौरविण्यात Glorified आले आहे.

- Advertisement -

मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील काही संशयितांतर्फे एका माजी सैनिकाचा खून करण्यात आला होता सदर घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात घडली होती तो गुन्हा नंतर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला होता.त्याबाबत कोणतेही धागेदोरे अथवा सुगावा न होता त्या गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान होते परंतु काही दिवसातच डीवायएसपी लावंड यांच्या तसेच पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली.

त्यात त्यांनी मध्यप्रदेश नांदुरा अकोट रावेर तालुक्यातील पाल परिसर तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव अशा ठिकाणी तपासाची चक्रे फिरवली असता सदर गुन्ह्याचा तपास काही दिवसातच लागला त्यात त्या प्रकरणातील आरोपींचा योग्य ड्रेस लावण्यात आला व त्यांच्याकडून एटीएम रोख पैसे परत मिळविण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले त्यानंतर मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील घरफोडी प्रकरणाचे सुद्धा मोठे आव्हान मुक्ताईनगर पोलिसांपुढे होते.

त्यात एकही सुगावा नव्हता परंतु तरीसुद्धा पोलिस पथकाने योग्य दिशेने तपास चक्रे फिरवली आणि संपूर्ण दागिने रोख रक्कम सुमारे साडेतीन लाखाचा ऐवज संबंधित आरोपीकडून पोलिसात जमा करून संबंधितांकडे देण्यात आला

मुक्ताईनगर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल जळगाव येथे एका विशेष बैठकीत डी जेपी विनायक कारगावकर आई जीपी शेखर पाटील तसेच जळगाव जिल्ह्याचे एसपी डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या हस्ते मुक्ताईनगर पोलिसा ठाण्यातील आहे. पी.एस.आय. शेवाळे , पी.एस.आय.परविन तडवी , पी.एस.आय.सुदाम काकडे , ए.एस. आय. सुखदेवराव निकम , पोलीस कॉन्स्टेबल नितीन चौधरी , संजय लाटे , श्री .नावकर, संजय पवार , मुकेश घुगे , संतोष नागरे, कांतीलाल केदारे , गोपीचंद सोनवणे , सुरेश पाटील, श्री.बेहेनवाल यांचे कौतुक व गौरव करण्यात आला. घरफोडीच्या तपासात जळगाव एल.सी.बी.चे पोलीस अधिकारी श्री.बकाल तसेच श्री.देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राजू मेढे , संजू हिवरकर व पथकाचे सहकार्य लाभले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या