Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedडॉक्टरांनो... 'ऍप्रन' घालून सार्वजनिक ठिकाणी फिरू नका!

डॉक्टरांनो… ‘ऍप्रन’ घालून सार्वजनिक ठिकाणी फिरू नका!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) तसेच रुग्णालयाबाहेर ऍप्रन परिधान करू नये, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयुएचएस) वतीने नुकत्याच देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि सर्व संबंधित महाविद्यालयांच्या अधिष्ठाता तसेच प्राचार्यांमार्फत याविषयीचे परिपत्रक महाविद्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात यावे, असेही या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, समचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी व तत्सम आरोग्य विज्ञान या अभ्यासक्रांचे विद्यार्थी तसेच निवासी डॉक्टर म्हणजेच पदव्युत्तर विद्यार्थी हे ऍग्रन परिधान करून महाविद्यालय व रुग्णालयाबाहेर फिरत असतात. तसेच ऍप्रन परिधान करून खासगी वाहनाने प्रवास करतात. मात्र, सार्वजनिक ठिकाणी ऍप्रन परिधान केल्यामुळे वैद्यकीय पेशाच्या पोशाखाचे महत्त्व कमी होत आहे आणि एकूणच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातूनही ऍप्रन परिधान करून सार्वजनिक ठिकाणी फिरणे योग्य नाही, असे निरीक्षण ‘एमयुएचएस’ने या सूचनेत नोंदवले आहे. या एकंदर स्थितीचा विचार करता ‘एमयुएचएस’शी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी तसेच निवासी डॉक्टरांनी ऍप्रन परिधान करून महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाहेर अजिबात फिरू नये, अशी सूचनाही विद्यापीठाने दिली आहे.

याबाबत महाविद्यालय प्रमुखांमार्फत या संबंधीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करून समस्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. अलीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मॉल तसेच दालनांमध्ये ऍप्रन घातलेले डॉक्टर तसेच वैदयकीय क्षेत्रातील मंडळी हमखास दिसून येतात. विशेषतः सगळ्याच रुग्णालयांजवळील भागात असे चित्र पाहायला मिळते. अगदी फळे, भाज्यांच्या दुकानांपासून ते मॉलमध्ये ऍप्रन घातलेली मंडळी दिसून येते. ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या