Wednesday, April 1, 2026
Homeदेश विदेशDonald Trump: …तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येऊ शकते; ट्रम्प यांचा अमेरिकेतील...

Donald Trump: …तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येऊ शकते; ट्रम्प यांचा अमेरिकेतील न्यायालयाला इशारा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमेरिकेत आयात शुल्क (टॅरिफ) मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. याबाबत त्यांच्याविरोधात अमेरिकेच्या फेडरल सर्किट कोर्ट ऑफ अपीलमध्ये खटला सुरू आहे. न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल विरोधात गेल्यास अमेरिकेला १९२९ सारख्या महामंदीसारख्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (दि.८) सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला. त्यांच्या या इशाऱ्यामुळे अमेरिकेतील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

डाव्या विचारसरणीच्या न्यायालयाने आमच्याविरुद्ध निकाल दिला तर आपण देशाची समृद्धी व अब्जावधी डॉलर्सची होणारी कमाई गमावून बसू, यामुळे आपल्याला मोठ्या आर्थिक संकटाला आपल्याला सामोरे जावे लागेल. हा निर्णय अमेरिकेच्या संपत्ती, शक्ती आणि जागतिक प्रभावाविरुद्ध असेल. याचे गंभीर परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील, असेही ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केले. हे संपूर्ण प्रकरण ‘इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट’ (IEEPA) या कायद्यांतर्गत न्यायालयात सुरू आहे.

- Advertisement -

टॅरिफमुळे शेअर बाजारात प्रचंड वाढ होत आहे, दररोज नवीन विक्रम होत आहेत. देशाच्या तिजोरीत शेकडो अब्ज डॉलर्स येत आहेत. परंतू जर अतिरेकी डाव्या विचारसरणीच्या न्यायालयाने टॅरिफविरुद्ध निकाल दिला तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येऊ शकते आणि देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

अशा ‘ज्युडिशीयल ट्रॅजडी’मधून अमेरिका सावरण्याची कसलीही शक्यता नाही, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. मात्र यावेळी त्यांनी अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे. देशाला यश आणि महानता मिळायला हवी, गोंधळाची स्थीती, अपयश आणि अपमान नाही, जर निकाल विरोधात दिला तर इतकी मोठी रक्कम आणि सन्मान परत मिळवणे कठीण होईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शिशुवर्ग ते आठवी, नववी...