Friday, May 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' : ई-केवायसीतील दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ : ई-केवायसीतील दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थींना आता दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ मार्चपर्यंत होती. अनेक लाभार्थी महिलांचे ई-केवायसी पूर्ण न झाल्याने सरकारने ही मुदत एक महिन्याने वाढवून देण्याचा निर्णय घेतला.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना वरील माहिती दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी ही शेवटची संधी आहे. त्यामुळे पात्र महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू ठेवावा, असे आवाहन तटकरे यांनी यावेळी केले.

राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजेना जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली. योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे. त्यासाठी वेबपोर्टलवर ई -केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळीवेळी मुदतवाढ दिली गेली. या मुदतीत जवळपास १ कोटी ८० लाख लाडक्या बहिणींनी ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

ताज्या बातम्या