Friday, May 3, 2024
Homeनाशिकसंत निवृत्तीनाथ मंदिरास बंडा तात्यांच्या हस्ते ११ लाख देणगी

संत निवृत्तीनाथ मंदिरास बंडा तात्यांच्या हस्ते ११ लाख देणगी

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

येथील संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराला बंडातात्या कर्‍हाडकर यांचे हस्ते अकरा लाख ११ हजार १११ रुपये देणगी देण्यात आली.

- Advertisement -

मंदिराला सोन्याचा कळस बसवावा, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

मार्च महिन्यात येथे गाथा पारायण सोहळा झाला. या सोहळ्याचा जमा खर्च समितीकडून सादर करण्यात येऊन शिल्लक राहिलेली रक्कम आज देणगी रूपाने देण्यात आली.

सहा वर्षापूर्वी एका कार्यक्रमात बंडा तात्यांचे उपस्थितीत संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर सोन्यासारखे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त झाली होती. हा आठवणींचा धागा पकडून बंडा तात्यांनी निवृत्तीनाथ मंदिरचा कळस सोन्याचा करून देऊ , असे वारकरी भाविकांच्या उपस्थितीत सांगितले.

(दि. २६) रोजी पंढरपूर वारी प्रतिकात्मक वारी या सोलापूर जिल्हा प्रशासन शासन यांच्या भूमिकेबद्दल पत्रकरानी छेडले असता बंडा तात्यांनी सहमती दर्शवत वारकर्‍यांना बाजूला करता येणार नाही, असे म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या