Thursday, May 2, 2024
Homeधुळेशेतकर्‍याचे दुचाकीच्या डिक्कीतील 65 हजार लांबविले

शेतकर्‍याचे दुचाकीच्या डिक्कीतील 65 हजार लांबविले

दोंडाईचा – Dondaicha – वि.प्र :

शहरातील स्टेशन भागातील श्रद्धा सुपरशॉप बाहेर धावडे येथील शेतकर्‍यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील 65 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी पोेलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

शिंदखेडा तालुक्यातील धावडे येथील शेतकरी विठ्ठल भाऊराव पाटील हे आज दि. 3 रोजी दुपारी दुचाकीने दोंडाईचा येथे आले होते. त्यांनी घरुन आणलेले 55 हजार रुपये त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. त्यांनी देना तथा बँक ऑफ बडोदा शाखेतून पुन्हा दहा हजार रुपये काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले.

त्यानंतर त्यांनी दुचाकी स्टेशन परिसरातील श्रध्दा सुपरशॉप बाहेर उभी केली होती. दुचाकी बारा वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांच्या त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील 65 हजार रूपये लंपास केले.

चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी विचारपुस सुरू केली. त्यानंतर नागरिकांची एकच गर्दी केली होती. घटनास्थळी उपनिरीक्षक दिनेश मोरे, आसाराम वाडीले, संजय चव्हाण, संजय गुजराती,चंद्रकांत साळुंके, रोहिदास पावरा यांनी भेट देऊन पाहणी केली.पोलिसांनी या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज देखील तपासून पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या