Friday, November 15, 2024
HomeUncategorizedउच्च न्यायालयाचा आदर राखून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घ्या- शरद पवार यांचे...

उच्च न्यायालयाचा आदर राखून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घ्या- शरद पवार यांचे आवाहन

काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

महाविकास आघाडीने शनिवारी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर शहरातील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली.

यावर आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केली आहे. शिवाय कोणत्याही राजकीय पक्षाने पुकारलेला बंद हा बेकायदेशीर आहे असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तरी ही कोणी बंद पुकारत असेल तर विरोधात कायदेशीर कारवाई करावी असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे उद्याच्या मविआच्या बंदचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून शरद पवारांनी महाविकास आघाडीला उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.या ट्विटमधून शरद पवारांनी महाविकास आघाडीला उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र बंद कदाचित मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.

शरद पवार म्हणाले, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या (24 ऑगस्ट) राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.

आता उद्याच्या बंद बाबत कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे कडून काय निर्णय होतो त्यावर लक्ष देणे महत्वाचे असणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या