Monday, May 20, 2024
Homeधुळेई- बाईक्समध्ये अनधिकृत बदल करू नयेत!

ई- बाईक्समध्ये अनधिकृत बदल करू नयेत!

धुळे Dhule। प्रतिनिधी

ई- बाईक्स (e-bikes) वाहन उत्पादक, वितरक व नागरिकांनी अशा वाहनांमध्ये अनधिकृत बदल (unauthorized changes) करू नयेत. अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरिकांच्या सुरक्षितेच्या (safety) दृष्टिकोनातून अशा वाहनांची तसेच अशी वाहने उत्पादित करणारे उत्पादक व विक्री करणार्‍या वितरकांविरूध्द विशेष तपासणी मोहीम (Inspection campaign) राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. संबंधित वाहन उत्पादक, वाहन वितरक व वाहनधारकांविरुद्ध भारतीय दंडसंहितेंतर्गत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांनी (Transport Commissioner) दिल्या आहेत, अशी माहिती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाने पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण- 2021 लागू केले आहे. ई- बाईक्स (e-bikes) व ई- वाहनांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी शंभर टक्के सूट दिलेली आहे. आजअखेर एकूण 66 हजार 482 इलेक्ट्रीक दुचाकींची नोंदणी राज्यात झाली आहे.

केंद्रीय मोटार वाहन(Central Motor Vehicle Rules) नियमामध्ये बॅटरी ऑपरेटेड व्हेईकलची व्याख्या दिली असून त्यानुसार 250 वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांची वेग मर्यादा ताशी 25 किलोमीटर पेक्षा कमी आहे, अशा ई-बाईक्सना (e-bikes) नोंदणीपासून सूट आहे. अशा प्रकारे वाहन उत्पादन करणार्‍या उत्पादकास वाहन विक्री करण्यापूर्वी त्या वाहन प्रकाराची चाचणी ही केंद्रीय मोटार वाहन नियमात विहीत केलेल्या मान्यताप्राप्त संस्थाकडून (उदा. आरटी, आयसीटी, सीआरआटी) टाइप प्रूव्हल टेस्ट रिपोर्ट घेणे अनिवार्य आहे.

अशा प्रमाणपत्रांच्या आधारे परिवहन आयुक्त कार्यालय, अशा वाहनांना नोंदणीतून सूट देते व तसे संबंधित वाहन उत्पादकास व राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना कळविते. मात्र, काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई- बाईक्सची (e-bikes) विक्री करतात. तसेच ज्या ई- बाईक्सना वाहन उत्पादनाची मान्यता मिळाली आहे, अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल (Illegal alterations) करून अशा वाहनांची बॅटरी क्षमता 250 वॅट पेक्षा जास्त करतात अथवा वाहनाची वेगमर्यादा ताशी 25 किलोमीटरपेक्षा अधिकची करतात.

वास्तविक अशा वाहनांना नोंदणी आवश्यक नसल्यामुळे त्यांना वाहन चालक अनुज्ञप्तीची देखील आवश्यकता नाही. यामुळे अशा प्रकारे बेकायदेशीर बदल (Illegal alterations) करून वाहन विक्री केल्यास रस्ता सुरक्षेस गंभीर धोका (Serious danger) निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ई- बाईक्सना आग लागून अपघात (Accident) होत असल्याच्या घटना वारंवार निदर्शनास आल्या आहेत.

प्राधिकृत संस्थेने दिलेल्या मानांकनाप्रमाणे वाहन असल्याची खातरजमा नागरिकांनी करावी व अशी वाहने खरेदीपूर्वी संबंधित वाहन वितरक व उत्पादकांकडे मान्यताप्राप्त संस्थेचा टाइप प्रूव्हल टेस्ट रिपोर्ट घेणे व परिवहन आयुक्त कार्यालयाने (Office of the Commissioner of Transport) जारी केलेल्या परवानगीची प्रत असल्याची खातरजमा करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या