Friday, May 3, 2024
Homeजळगावसोशल मीडियावरील अफवांना बळी पडून वातावरण बिघडवू नका

सोशल मीडियावरील अफवांना बळी पडून वातावरण बिघडवू नका

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

त्रिपुरा राज्यातील (State of Tripura) घटनेनंतर राज्यात मालेगाव, वाशिम, नांदेड व अमरावती या ठिकाणी कायदा व सुवस्थेला गालबोट (Cheers to law and order) लागले आहे. त्या पार्श्वभूमिवर जळगाव जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार (Improper type should) घडू (not happen)नये, त्या पार्श्वभूमिवर जिल्हा पोलीस दल अलर्ट (District Police Alert) झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रविवार, 14 नोव्हेंबर रोजी तातडीची शांतता समितीची बैठक (Peace Committee Meeting) बोलावली. पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंगल सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्यात शांतता नांदावी, अनुचित प्रकार घडू नये, सोशल मिडीयावर अफवांना बळी पडू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (Superintendent of Police Dr. Praveen Mundhe) यांनी केले.

- Advertisement -

त्रिपुरा येथील घटनेनंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरण चिघळले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेच्या पार्श्वभूमिवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी रविवारी जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये शांतता समितीच्या बैठक घेण्याचे आदेश दिले. जळगाव शहरात पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंगलम सभागृहात ही शांतता समितीची बैठक पार पडली. बैठकीला व्यासपीठावर अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर कुलभुषण पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा उपस्थित होते. यांच्यासह सर्वधर्मिय शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, यांच्यासह शांतता समितीचे सदस्य अनिल अडकमोल, सैय्यद अय्या अली नियाज अली, यांनीही मनोगत व्यक्त केेले. बैठकीला शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक तसेच शांतता समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांनी व्यक्त केले. बैठकीत समितीच्या सदस्यांनी केलेल्या विविध मुद्यांवर पोलीस अधीक्षकांनी उत्तरे देत समाधाान केले.

सोशल मिडीयावर अफवांना बळी पडू नका

पुढे बोलतांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, इन्टाग्राम यासह इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोणी भडकावित असेल तर त्याचा प्रयत्न हाणून पाडा. वातावरण खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी. अनुचित प्रकार घडू नये म्हणूून सर्वधर्मिय सदस्यांनी काळजी घ्यावी असेही ते म्हणाले. कुणी काही अनुचित प्रकार करत असेल, किंवा भावना भडकावित असेल तर त्याबाबत पोलिसांना कळवा, योग ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

रथोत्सव शांततेत साजरा करा...

दुसरीकडे सोमवारी जळगाव शहरातील रथोत्सव आहे. त्या पार्श्वभूमिवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असून बंदोबस्त तैनात राहणार आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार वेळेचे व सर्व नियमांचे पालन करत, सर्वांनी रथोत्सव साजरा करण्याचे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंंढे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या