Wednesday, November 6, 2024
Homeधुळेघर खाली करण्यासाठी बंदुकीचा धाक

घर खाली करण्यासाठी बंदुकीचा धाक

धुळे ।dhule । प्रतिनिधी

शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरात घर खाली करण्यासाठी (bring down the house) घरात घुसून (Entering the house) बंदुकीचा धाक दाखवित (fear of the gun) एकावर तलवार, (sword on one,) चाकुने जीवघेणा (fatal attack)हल्ला केला. तर त्यांच्यासह इतरांना बेदम मारहाण केली. घरातील महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र व रोख रक्कम लुटून नेली. याप्रकरणी 9 जणांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत विशाल प्रविण सोनवणे (वय 30 रा. प्लॉट नं. 4, सहजिवन नगर,धुळे) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अरूण भगवंतराव मदने रा.पवन नगर, महेंद्र उर्फ काळ्या माळी, पवन वाघ, राहुल उर्फे भावड्या डोलारे, देवा सोनवणे, राजेंद्र माने सर्व रा.जमनागिरी धान्य गोडावून परिसर, अजय पवार रा.फाशीपुल, मनोज पिसे, पांडूरंग पिसे दोन्ही रा.संभाप्ता कॉलनी क्रांती चौक यांनी दि.16 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास शासकीय दूध डेअरी गेट समोर सहजिवन नगर येथे प्लॉट नं. 4 मध्ये अनधिकृत प्रवेश करीत अरूण मदने याने जागा आपण विकत घेतली असून घर खाली करण्यास सांगून देखील घर खाली केले नाही, असे म्हणत तुम्हाला जीव प्यारा नाही का, अशी धमकी दिली.

तेव्हा फिर्यादीच्या आईने घराचे खरेदीखत आमच्याकडे असल्याचे सांगितले. त्याचा राग येवून त्यांना धक्का दिला. तसेच अजय पवार याने खिशातून बंदुक काढत धाक दाखवित घर खाली करण्यासाठी धमकविले. तर महेंद्र माळी याने दुचाकीला लावलेली तरवार काढून फिर्यादीचा भाऊ आकाश याच्या गालावर वार केले. पवन वाघ याने चाकूने आकाशच्या पायावर वार केले. तर अरून मदने यानेही लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच दोघा महिलांनाही मारहाण करण्यात आली.

तर मनोज पिसे याने फियादीच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे मंगलसुत्र ओढून घेतले.तसेच घरातील बाराशे रूपये बळजबरीने हिसकावले. तसेच वॉलकंपाऊटचे तोडफोड करून नुकसान केले. त्यादरम्यान मदतीसाठी धावून आलेल्या परिसरातील नागरिकांनाही धक्काबुक्की केली. त्यानुसार 9 जणांवर शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या