Monday, June 15, 2026
HomeनगरCrime News : हुंडा व मालमत्तेच्या मागणीसाठी दोन विवाहितेंचा छळ

Crime News : हुंडा व मालमत्तेच्या मागणीसाठी दोन विवाहितेंचा छळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

सासरच्या मंडळींकडून हुंडा, पैशांची मागणी व मालमत्तेच्या नावांतरणासाठी होणार्‍या छळाच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या असून, या प्रकरणांमध्ये संबंधित विवाहितांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पतीसह सासरच्या नातेवाईकांविरूध्द फिर्यादी दाखल केल्या आहेत. दोन्ही प्रकरणांत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

एमआयडीसी पोलीस ठाण्यात 33 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून फिर्याद दाखल केली आहे. पती जैन अहमद हिफझुर रहमान शेख, सासू रिझवाना हिफझुर, सासरे हिफझुर रहमान मोहम्द शफी शेख (सर्व रा. आलमगीर, भिंगार) आणि नणंद झेबा युसुफ खान (रा. दिल्लीगेट, अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींनी घरखर्चासाठी माहेरून पैसे आणण्याचा तसेच वडिलांच्या नावावर असलेले घर स्वतःच्या नावावर करून देण्याचा तगादा लावला. गृहकर्जाचे हप्त भरण्यासाठी माहेरून 70 हजार रूपये आणण्याची मागणी करण्यात आली. भरोसा सेलमध्ये समझोता न झाल्याने अखेर पीडितेने पोलिसांत फिर्याद दिली.

दरम्यान, दुसर्‍या घटनेत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहन खरेदीसाठी पाच लाख रूपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित 20 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पतीने आई-वडिलांकडून पाच लाख रूपये घेऊन ये, मला चारचाकी गाडी घ्यायची आहे, अशी मागणी करत वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला. लग्नात सोन्याची अंगठी दिली नाही, या कारणावरूनही तिला टोमणे मारले जात होते. पीडितेच्या फिर्यादीवरून पती सुरज विजय लोखंडे, सासु विमल विजय लोखंडे, दीर रमेश विजय लोखंडे (सर्व रा. गुणवडी, ता. अहिल्यानगर), ननंद सविता ससाणे (रा. मढेवडगाव, ता. श्रीगोंदा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...