Monday, May 20, 2024
Homeधुळेडॉ. आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत 500 रुपयांत वीजजोडणी

डॉ. आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत 500 रुपयांत वीजजोडणी

धुळे Dhule। प्रतिनिधी

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने घरगुती वीज जोडणी (Household electrical connection) उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Dr. Nitin Raut) यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत (Dr. Ambedkar Jeevan Prakash Yojana ) धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 246 ग्राहकांना वीजजोडणी (electricity connection) देण्यात आली आहे. 6 डिसेंबर 2022 पर्यत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

- Advertisement -

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने वीज जोडणी कार्यक्रम 14 एप्रिल 2021 पासून सुरू करण्यात आला. महावितरणाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (Chairman and Managing Director of MSEDCL Vijay Singhal) यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेत आजपर्यंत धुळे जिल्ह्यात 131 तर नंदुरबार जिल्ह्यात 115 ग्राहकांना वीजजोडण्या (electricity connection) देण्यात आलेल्या आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकार्‍याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी करण्यात येणार्‍या विहित नमुन्यानुसार आवश्यक कागदपत्रे उदा. आधारकार्ड, रहिवासी दाखला आदी आवश्यक आहे. तसेच अर्जदारांनी वीज जोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यास 500 रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे एक रकमी जमा करण्याचा अथवा सदर रक्कम पाच समान मासिक हफ्त्यांमध्ये वीजबिलाद्वारे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अर्जदाराचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (Maharashtra Electricity Regulatory Commission) तरतुदीच्या अधीन राहून वीजजोडणी उपलब्ध करण्यात येईल. महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील 15 कार्यालयीन दिवसांत वीजजोडणी देण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या