Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशDr. Kumar Vishwas: 'कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं…';...

Dr. Kumar Vishwas: ‘कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं…’; दिल्ली विधानसभा निवडणुकीवर डॉ. कुमार विश्वास यांची पोस्ट व्हायरल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीत सध्या विधान सभा निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. भाजप सध्या ४७ जागांवर पुढे आहे. तर आम आदमी पार्टी २३ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय काँग्रेस यावेळी खातेही उघडेल असे वाटत नाही. अशा परिस्थितीत आम आदमी पक्ष यावेळी खूप मागे दिसत आहे. यानंतर भाजप नेत्यांकडून सातत्याने प्रतिक्रिया येत असून ते आम आदमी पक्षाला कोंडीत पकडत आपल्या विजयाचा दावा करत आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनीही आम आदमी पार्टीवर निशाणा साधला आहे.

कधीकाळी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय असलेले डॉ. कुमार विश्वास यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यामुळे वेगळा मार्ग निवडला. कुमार विश्वास हे त्यांच्या कवितांसाठी प्रसिद्द आहे. त्यांनी या आधी आम आदमी पक्षात अरविंद केजरिवाल यांच्या खांद्याशी खांदा लावून देखील काम केले आहे. मात्र कालांतराने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आप मधून बाहेर पडल्यानंतर ते इशाऱ्यांमध्ये, मिश्किल टिपण्णी करत खोचक टोला लगावतात, कधी कधी चिमटेही काढतात. आज दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल असून प्रपोज डे सुद्धा आहे. याच दरम्यान कुमार विश्वास यांनी काव्यात्मक शैलीत पोस्ट शेअर केली आहे, ज्यावरून अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.

- Advertisement -

डॉ. कुमार विश्वास यांनी एक्स हँडलवर पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी म्हंटले आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया – या सह त्यांनी ब्रोकन हार्ट इमोजी टाकत एक व्हिडीओही शेअर केलाय. बहुत बिखरा, बहुत टूटा, थपेड़े सह नहीं पाया. हवाओं के इशारों पर मगर मैं बह नहीं पाया. अधूरा अनसुना ही रह गया यूं प्यार का किस्सा. कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया – अशा ओळी त्यांनी म्हटल्या आहेत.

दिल्लीत भाजपचे कमळ फुलले
नवी दिल्ली विधानसभेच्या जागेवर ५ फेब्रुवारीला मतदान झाले आणि आज त्याची मतमोजणी होऊन निकाल समोर येण्यास सुरूवात झाली आहे. भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत. दिल्लीत आपचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभेतील ७० पैकी ७० जागांचे कल समोर आले आहे. पोस्टल मतमोजणीत आणि आता ईव्हीएममधील मतमोजणीचा कल सुद्धा भाजपाच्या बाजूने दिसत आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी ‘आप’ला तिसऱ्यांदा संधी देण्यास नकार दिल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

‘आप’ ला धक्क्यांवर धक्के
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास १२०० मतांनी पराभव झाला आहे. तर माजी मुख्यमंत्री आणि केजरिवाल यांचे विश्वासू मनिष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे. मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी ही जागा १८४४ मतांनी जिंकली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...