Tuesday, August 18, 2026
Homeनगरजिल्ह्यात दोन दिवस पॅराग्लाईडींग तर राहाता-कोपरगावात उड्डाणबंदी

जिल्ह्यात दोन दिवस पॅराग्लाईडींग तर राहाता-कोपरगावात उड्डाणबंदी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये ४ व ५ ऑक्टोबरदरम्यान लोणी (ता. राहाता), तसेच कोपरगाव येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण जिल्ह्यात दोन दिवस पॅराग्लाईडींग करण्यासोबतच राहाता आणि कोपरगाव तालुक्यात रेड झोन-उड्डाणबंदी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री हे अति महत्वाचे व संरक्षीत व्यक्ती असल्याने त्यांना झेड प्लस सीआरपीएफ कव्हर ऑल इंडिया ही सुरक्षा वर्गवारी आहे. जिल्ह्यात यापूर्वी अतिमहत्वाची व्यक्तीच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाच्या क्षेत्रांना उड्डाणप्रतिबंधीत क्षेत्र घोषित करूनही ड्रोन उड्डाण करण्यात येत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. यामुळे संरक्षीत व्यक्तीच्या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत, कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी आज शनिवार (दि.४) व उद्या रविवार (दि.५) रोजी राहाता व कोपरगाव तालुक्यात रेड झोन आणि तात्पूर्ता उड्डाणप्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव राहाता व कोपरगाव तालुक्यात आज आणि उद्या (दोन दिवस) तात्पुरता लाल झोन/उड्डाणबंदी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच इतर लागू कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हे आदेश काढण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई-पुण्यातून मागवल्या अँटीड्रोन गन

दरम्यान, संरक्षण मंत्री शाह यांच्या दौऱ्यानिमित्ताने मुंबई-पुण्यातून अँटीड्रोन गन मागवण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर कोणी ड्रोन उडवल्यास ते पाडण्यासाठी अँटीड्रोन गनचा वापर करण्यात येणार असल्याचे प्रशासनातील सुत्रांच्यावतीने सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : दहाव्या मैलाजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

0
नाशिक | Nashik मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) दहाव्या मैलाजवळ हॉटेल अमृत पंजाब आणि गरवारे पॉईंट परिसरात आज (मंगळवारी) सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाल्याची...