Thursday, November 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजफटाके फोडण्याच्या वादातून तरुणावर हल्ला; तिघांना अटक

फटाके फोडण्याच्या वादातून तरुणावर हल्ला; तिघांना अटक

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

फटाके फोडण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तरुणाच्या जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची घटना विमाननगर परिसरात घडली. फटाके उडविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी एका तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अमन शेख (वय २२, रा. कलवड वस्ती, लोहगाव
रस्ता) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून विमानतळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

राम नागनाथ नवले (वय १९), तेजस उमाकांत शिंदे (वय २०, दोघे रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) आणि सम्यक संदीप साळवी (वय १८, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमनचे
वडील समीर शेख (वय ५०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगरमधील रोझ गार्डन सोसायटी रस्त्यावर अमन शेख आणि त्याचे मित्र फटाके उडवत होते. त्याचवेळी आरोपी काही अंतरावर फटाके उडवत होते. फटाके उडविण्यावरून दोन्ही गटांत वाद झाला. त्यातून आरोपींनी अमनला दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात अमन गंभीरजखमी झाला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक एस क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Accident : दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon मुंबई-आग्रा महामार्गावर तसेच मालेगाव-मनमाड रोडवर आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये येवला...