Friday, May 3, 2024
Homeनगरकानिफनाथ यात्रा रद्द झाल्याने मढीत शुकशुकाट

कानिफनाथ यात्रा रद्द झाल्याने मढीत शुकशुकाट

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ यांची यात्रा प्रशासनाने रद्द केली. एरव्ही संपूर्ण

- Advertisement -

तालुक्यात राज्यातून येणार्‍या भाविकांच्या वर्दळीने होणारा गजबजाट पूर्णपणे शांत राहील. यात्रेनिमित्त विविध व्यवसायिक, देवस्थान समिती व वाहतुकदारांची मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.

मढी येथील रंगपंचमीला यात्रेचा दुसरा टप्पा व मुख्य दिवस असतो. चतुर्थी, पंचमी व नाथषष्ठी अशी तीन दिवस यात्रा भव्य प्रमाणात भरते. देवाच्या काठ्या म्हणून हजारो काठ्या राज्याच्या विविध भागातून भक्ती भावाने वाजत-गाजत मढी येथे घेऊन मंदिराच्या कळसाला लावून विविध धार्मिक विधी भाविकांकडून केले जातात. यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार ,मिठाईसह रेवड्यांचा बाजार, नाथ पुजासाहित्य त्यामध्ये कोट्यवधीची उलाढाल होते.

राज्याच्या कानाकोपर्‍यातून कर्नाटक, तेलंगणा, गुजरात राज्यातून भक्त मोठ्या प्रमाणात येतात.राज्यातील राज्यस्थानी भाविक रामदेव महाराजांचे स्थान म्हणून रंगपंचमीच्या दिवशी येथे येऊन सामूहिक महाप्रसाद कार्यक्रम करतात. एस. टी. बसच्या शेकडो जादा गाड्या नगर विभागामार्फत यात्रा काळात चालवल्या जातात.

यंदा करोनाच्या पार्श्वभूमिवर यात्रा बंद करून तालुका प्रशासन आणि पोलिसांनी मढीकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स बांधून बंद केले. वारी पूर्ण करण्यासाठी म्हणून काही भाविक पायी चालत काठी घेऊन आले त्यांनाही मंदिराच्या दिशेने काठी उंचावून कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरावे लागले.

संपूर्ण पंचक्रोशीत नीरव शांतता होऊन ग्रामस्थ सुद्धा घरात बसून राहिले. पोलीस निरीक्षक रणजित डेरे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, कोषाध्यक्ष बबन मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, विश्वस्त भाऊसाहेब मरकड, श्यामराव मरकड कार्यकारी अधिकारी अशोक पवार व्यवस्थापक बाबासाहेब मरकड, पोलीस अप्पासाहेब वैद्य देवस्थानचे सर्व कर्मचारी, पोलीस कर्मचारी सर्व बाजुनी लावलेत्या बॅरी कॅट्सजवळ थांबून भाविकांना माघारी फिरण्याची विनंती करत होते.

यात्रेच्या शेकडो वर्षाच्या इतिहासात प्रथमच गावात जमावबंदीचा आदेश लागू झाल्याने गावकरी सर्व भाविकांनी तीव्र दुःख व्यक्त केले. कानिफनाथ समाधी सोहळा उत्सवानिमित्त संपूर्ण गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मुख्य समाधी मंदिरामध्ये सुगंधी फुले व फुलांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या