Tuesday, October 15, 2024
Homeक्राईमजागेच्या वादातून जु्न्या जागा मालकाने लाखो रुपयांची मागितली खंडणी; गुन्हा दाखल

जागेच्या वादातून जु्न्या जागा मालकाने लाखो रुपयांची मागितली खंडणी; गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी
जागेच्या वादातून जुन्या जागामालकाने दुसऱ्या व्यक्तीकडून ५ लाख रुपयांची खंडणी मागत त्यापैकी ५० हजार रुपये खंडणी स्वरुपात घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सखाराम वसंत साळवे (रा. आनंदवली) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ध्रुवनगर येथील रहिवासी भास्कर शेषराव शिंदे (४२) यांच्या फिर्यादीनुसार, संशयिताने बुधवारी (दि. ११) सायंकाळी आठच्या सुमारास ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. शिंदे हे बबन जगताप यांच्या जागेची देखभाल करीत असतात. जगताप यांची आनंदवली शिवारात स्थावर मालमत्ता आहे. या मालमत्तेचे पूर्वीचे मालक सखाराम साळवे व जगताप यांच्यात वाद सुरु आहे. या मालमत्तेवर इमारतीचे बांधकाम सुरु असून शिंदे देखरेख ठेवतात.

- Advertisement -

दरम्यान, बुधवारी सायंकाळी संशयित साळवे यांनी शिंदे यांना फोन करून खंडणीची मागणी केली. त्यामुळे शिंदे यांनी आमच्या मालमत्तेत तुमचा काही संबंध नाही, असे सांगत कामात अडथळे आणू नका पैसे मिळणार नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले. त्याचा राग आल्याने संशयित साळवे यांनी शिंदे यांना मारहाणीची धमकी देत मध्यस्थी करू नको, असे धमकावले. तसेच माझ्याविरोधात तक्रार केली तर जेलमधून बाहेर आल्यावर बघून घेईल, अशीही धमकी देत जागेवर जागामालक कसा येतो ते बघतो, अशी दमदाटी केली. याआधी साळवे यांना ५० हजार रुपये दिल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. तरीदेखील पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याने शिंदे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात साळवे विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या