Thursday, May 2, 2024
Homeनाशिककिल्ले रामशेजवर 'दुर्ग महोत्सव' जल्लोषात साजरा

किल्ले रामशेजवर ‘दुर्ग महोत्सव’ जल्लोषात साजरा

पाटोदा | वार्ताहर

नाशिकपासून 18 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या किल्ले रामशेज येथे दसऱ्याचे औचित्य साधत दुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

(व्हिडीओ : म. तू. शेटे पाटोदा, नाशिक)

नाशिक जिल्ह्यात गड दुर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या स्वराज्य इतिहासाच्या पाऊल खुणा परिवारातर्फे दरवर्षी दसरा दुर्ग महोत्सवाचे आयोजन केले जाते.

यावर्षी करोनाचे सावट असल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून मोजक्या शिवविचारांच्या शिलेदारांच्या उपस्थित हा कार्यक्रम किल्ले रामशेज येथे पार पडला.

यावेळी गड पूजन, राम-सीता मंदिर पूजन व गडाच्या बुरुजावर ध्वजारोहण करण्यात आले. तसेच ध्वजारोहणानंतर बाल दुर्ग अभ्यासकांचे प्रात्यक्षिक व पोवाडा गायन तसेच गडदुर्ग संर्वधक राम खुर्दळ, शिवव्याख्याते दिपक राजे देशमुख यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.

या दुर्ग महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिवाराचे संस्थापक कैलास दुगड, विशाल जाधव, शुभम मेधने, रवींद्र बिडवे, मीना शिंदे अनिता देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या