Friday, May 3, 2024
Homeनगरदसरा सणाच्या पार्श्वभूमीवर सुप्याची फुलांची बाजारपेठ सज्ज

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर सुप्याची फुलांची बाजारपेठ सज्ज

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

नगर-पुणे महामार्गावरील सुपा गाव हार फुलांसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. येथील फुले, हार यांनी केव्हाच महाराष्ट्राच्या सिमा पार केली आहे. दसरा सणासाठी सुपा येथील फुलांची आणि हार विक्रीची बाजारपेठ सज्ज झाली आहे. मात्र, फुलांना उठाव नसल्याने बाजार मार्गील वर्षीच्या तुलनेत मर्यादित आहे.

- Advertisement -

पारनेर तालुक्यातील सुपा येथे बाराही महिने मोठ्या प्रमाणात हार विक्रीचा व्यवसाय सुरू असतो. या हार विक्रीवर शेकडो कुटुंबाचा उदार निर्वाह चालतो. गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, दसरा आणि दिपावली या काळात येथे हार विक्रीत मोठी उलाढाल होते. खास करून दसर्‍याच्या पूर्वसंध्येला येथे हाराची मोठी उलाढाल होते. हजारो हातांना या काळात काम मिळते. गेल्या दीड वर्षापासून करोनाने हार विक्रेत्याचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे यंदा सण, उत्सवात सुपा येथील हार विक्रेत्यांना मोठी अपेक्षा आहेत. या व्यवसायावर या हार विक्रेत्याचे अर्थकारण अवलंबून आहे.

चालूवर्षी फुलांना मोठा उठाव नसल्यामुळे बाजारभाव मागील वर्षीच्या तुलनेत मर्यादित आहेत. शेवंतीफुले 70 ते 80 रुपये पासून 100 रुपये किलो आहेत. तर आष्टर 80 ते 90 रुपये किलो, गुलाब 100 रुपये किलो, तर झेंडू (गोंडा) 70 ते 80 रुपये किलो आहेत. तर बनवलेले तयार हार हे 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत विकले जात आहेत. सुप्यात हार खरेदी करण्यासाठी नगर-पुणे-मुंबई येथून मोठ्या प्रमाणात व्यापारी कंपनी मालक येत असतात तर महामार्गावरील वाहने रोज सुपा येथून हार खरेदी करतात. खासगी प्रवासी बसमार्फत येथील हार रोज राज्याबाहेर जातात. सुप्यात बनवले जाणारे हार चांगल्या प्रतिचे असल्यामुळे त्यांना बाराही महिने मोठी मागणी असते. दसरा, दिवाळीत येथे मोठी उलाढाल होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या