Monday, May 20, 2024
Homeधुळेधुळे ; 21 पेक्षा अधिक ग्रा. पं. काँग्रेस महाविकास आघाडीच्या ताब्यात

धुळे ; 21 पेक्षा अधिक ग्रा. पं. काँग्रेस महाविकास आघाडीच्या ताब्यात

धुळे – प्रतिनिधी dhule

तालुक्यातील ग्रामपंचायतीवर (Gram Panchay) पुन्हा एकदा आ.कुणाल पाटील (mla Kunal Patil) यांनी मुसंडी मारत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेस, महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकविला आहे. दरम्यान तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या मुकटी, देऊर बु., मांडळ, नंदाणे या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपला झेंडा फडकविला आहे.

- Advertisement -

आतापर्यंत एकूण 21 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेस महाविकास आघाडीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दरम्यान दुपारपर्यंत झालेल्या मतमोजणीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

आज रोजी धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आले. सुरुवाती पासूनच धुळे तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस महाआघाडीची सत्ता आहे. आणि आता पुन्हा एकदा आमदार पाटील यांनी मुसंडी मारत वर्चस्व कायम राखले आहे.

आतापर्यंत एकूण 21 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेस महाविकास आघाडीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दरम्यान दुपारपर्यंत झालेल्या मतमोजणीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

सर्वाधिक ग्रामपंचायती काँग्रेस-महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. सरपंचांसह सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्यही काँग्रेस पक्षाचे विजयी झाले आहेत. दरम्यान धुळे तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या मुकटी, धनुर, मांडळ, रावेर, नंदाणे, कुळथेसह बहुसंख्य ग्रामपंचायतवर काँग्रेसने झेंडा फडकविला असून फागणे ग्रामपंचायतीच्या काँग्रेस उमेदवाराचा फक्त 84 मतांनी निसटता पराभव झाला, मात्र तेथे 14 ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस महाविकास आघाडीचे विजयी झाले आहेत.

बिनविरोध ग्रामपंचायती काँग्रेस महाविकासच्या ताब्यात

माघारीअंती बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीवरही आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ताब्यात आले आहेत. त्यात विश्वनाथ सुकवड, मांडळ या ग्रामपंचायतीवर काँग्रेस बिनविरोध निवडून आली आहे, तर मेहरगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस (महाविकास आघाडी) आणि नावरा,चांदे ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या