Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशभूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी राजधानी दिल्लीसह उत्तर भारत हादरला; नेपाळमध्ये ८ जणांचा मृत्यू

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी राजधानी दिल्लीसह उत्तर भारत हादरला; नेपाळमध्ये ८ जणांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

मंगळवारी रात्री उशिरा भारत (India) चीन (China) आणि नेपाळमध्ये (Nepal) भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ पर्यंत मोजली गेली.

- Advertisement -

भारतातील दिल्ली, यूपी, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या मणिपूर इथं जमिनीपासून १० किलोमीटर खोल असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान मागील २४ तासांमधील नेपाळमधील हा दुसरा भूकंपाचा धक्का आहे. याआधी मंगळवारी सकाळी ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.

यापूर्वी २०१५ मध्ये नेपाळमध्ये राजधानी काठमांडू आणि पोखरा शहरादरम्यान ७.८ रिश्टर स्केलचा उच्च-तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपात ८ हजार ९६४ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २२ हजार जण जखमी झाले होते, असे म्हटले जाते.

हा भूकंप गोरखा भूकंप म्हणून ओळखला जातो. या भूकंपाचा धक्का उत्तर भारतातील अनेक शहरांना बसला होता. तसेच, पाकिस्तानातील लाहोर, तिबेटमधील ल्हासा आणि बांगलादेशातील ढाका येथेही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या