Thursday, March 13, 2025
Homeनाशिकईट राईट इंडिया उपक्रमांतर्गत मंत्रालय परिसरात अन्न व औषध प्रशासनाची जनजागृती मोहिम

ईट राईट इंडिया उपक्रमांतर्गत मंत्रालय परिसरात अन्न व औषध प्रशासनाची जनजागृती मोहिम

ओझे l विलास ढाकणे | Oze

अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.नरहरी झिरवाळ (Minister of Food and Drug Administration Narahari Jirwal) व सिनेअभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांची उपस्थिती. ईट राईट इंडिया (सही भोजन बेहतर जीवन) या घोषवाक्यासह अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबविण्यात येत असलेले अभियान लोकाभिमुख व्हावे तसेच सर्वसामान्यांना मिळणारे अन्न पदार्थ सुरक्षित व सकस असावेत हा अभियानाचा उद्देश आहे.

- Advertisement -

या अभियानाअंतर्गत ईट राईट स्ट्रीट फुड हब, ईट राईट स्टेशन, ईट राईट कॅम्पस, ईट राईट स्कुल, हाइजिन रेटिंग, जैविक भारत, सेव फुड शेअर फुड, ईट राईट प्लेस ऑफ वर्शिप, इ. उपक्रमांचा सामावेश आहे.  

या अभियानांतर्गत मंत्रालयाचा परिसर ईट राईट कॅम्पस व्हावा व यास अन्न सुरक्षा मानके प्राधिकरणाकडून तसे सन्मान पत्र मिळावे तसेच सर्व जनतेला सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत असा मनोदय घेऊन विभागाचा प्रमुख म्हणून कामास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगे आज मंत्रालयीन परिसरातील कँटीन व खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या तपासणी मोहिम व जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.

Food Safety is everyone’s responsibility (अन्न सुरक्षा सर्वांची जबाबदारी) या जागतिक आरोग्य संघटना WHO च्या घोषणेप्रमाणे सर्वांनी या कामी आपले योगदान देऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी केले.

या उपक्रमास सिने अभिनेते व वृक्ष संवर्धनाच्या चळवळीमध्ये अग्रेसर असलेले सयाजी शिंदे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व अन्न सुरक्षा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या उपक्रमांतर्गत “फुड सेफ्टी ऑन व्हील” या फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून घरच्या घरी अन्न पदार्थातील भेसळ कशी ओळखावी. अन्न पदार्थ खरेदी करताना काय काळजी घ्यावी याबाबतची प्रात्येक्षिके दाखविण्यात आली. सदर मोहिम राज्यभर व्यापक स्वरुपात करण्याच्या सुचना मंत्री, ना.नरहरी झिरवाळ यांनी दिल्या. 

या उपक्रमामध्ये प्रशासनाचे अधिकारी श्री.अरविंद कांडेलकर, श्री.राहुल ताकाटे, श्रीमती नसरीन मुजावर, श्री.हेमंत शेलार, श्री.राजू आक्रुपे, श्री.इंद्रजित चिलवंते, श्रीमती अर्चना वानरे, श्रीमती हर्षा येवले, श्रीमती कस्तुरी चिपळूणकर, श्री.योगेश कणसे यांनी सहभाग नोंदविला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...