Friday, May 3, 2024
HomeUncategorizedकर्टुल्यांचा आदिवासींना हातभार

कर्टुल्यांचा आदिवासींना हातभार

लखमापूर । राजेंद्र जाधव | Lakhmapur

गणेशोत्सव (ganeshotsav) काळात दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) रानभाज्यांना (Wild vegetables) मोठी मागणी असते.

- Advertisement -

त्यामध्ये रानभाज्यांचा राजा समजल्या जाणार्‍या कर्टुले (Kartule) या रानभाजीने तर सध्या ग्रामीण भागातील (rural area) बळीराजांला व आदिवासी बांधवांना (tribal community) यंदा चांगला आर्थिक दिल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रत्येक सणांला रानभाज्यांना मोठी मागणी ग्राहक वर्गातुन केली जाते. त्यात गणेश उत्सव (ganeshotsav) असल्याने दिंडोरी तालुक्यातील रानभाज्या महाराष्ट्रांत (maharashtra) दुरदुर जात असतात. त्यात सध्या रानभाज्यांमधील (Wild vegetables) राजा समजला जाणारे कर्टुले याला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे आदिवासी भागांला ही रानभाजी सध्या आर्थिक आधार देणारी ठरत आहे. कर्टुले हे डोंगर माथ्यावर, दरीखोर्‍यात येणारी वेलवर्णिय वनस्पती मानली जाते.

साधारणपणे ही वनस्पती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर उगवते. ही वनस्पती भाजी (Vegetables) आरोग्यदायी असल्याने बाजारपेठेत हिला मोठी मागणी असते. दिंडोरी तालुक्यातील बहुतेक भाग आदिवासी पट्ट्यात मोडत असल्याने जंगलातील रानभाज्या (wild vegetables) तसेच रानफळे विकुन उदरनिर्वाह करणारे या भागात आदिवासी बांधव (tribal community) दिसून येतात.

त्यामुळे ग्राहक वर्गाला रानातील चांगल्या प्रतिच्या आयुर्वेदीक (Ayurvedic) शरीराला उत्तम स्वास्थ्य देणा-या भाज्या व फळे खायला मिळतात. या रानभाज्यांमध्ये कर्टुले नामक एक भाजी असुन ती भाजी शरीरांला आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या भाजीला कुठलीही रासायनिक फवारणी या खत वापरले जात नाही.त्यामुळे नमक दर्जाची भाजी म्हणून ओळखली जाते. नैसर्गिक रित्या पावसाळ्यात येणारी प्रमुख भाज्यांमध्ये कर्टुले अत्यंत पौष्टिक अशी मौसमी भाजी आहे.

तिला पाहुनी भाजी ही म्हणतात.कारण ही वनस्पती फक्त पावसांळ्यात येते की वर्षभर गायब राहाते. ही भाजी खाल्याने कर्करोग, ह्रदयरोग, मधुमेह, मुळव्याध,या आजारांवर ही वनस्पती लाभदायक असते.

सदर भाजी फक्त पावसाळ्यात येत असल्याने ग्रामीण व शहरी भागात हिला मोठी मागणी असते. सध्या मितीला जागेवर 100ते 150 रूपये प्रति किलो तर विविध बाजारपेठेत 250 पर्यंत चा भाव मिळत आहे.मध्यंतरी च्या काळात या भाजीला अत्यंत कमी भाव मिळत होता. तेव्हा आमचा वाहतूक खर्च फिटत नव्हता. परंतु आता थोड्याफार प्रमाणात भाव हा वाढल्याने खर्च सुटत आहे.

– योगराज रौंदळे, शेतकरी, पुणेगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या