Friday, May 3, 2024
HomeUncategorizedमाणसाच्या सभ्यतेचा काळ कोणता ?

माणसाच्या सभ्यतेचा काळ कोणता ?

संचारबंदी संपायला अजून चार दिवस बाकी आहेत. घरी थांबा, हात धुवा आणि सोशल डिस्टन पाळा असे सांगून शासन व्यवस्थेने आता फक्त पाय पडायचे तेव्हडे बाकी राहिले आहेत. भाजी बाजारात होणारी गर्दी कमी व्हायला तयार नाही. विनाकारण आणि सहज फेरफटका मारणारांची संख्या कमी झालेली नाही. पोलिसांनी सर्व उपाय करूनही फिरणारे घरात रहात नाही. शेवटी गझलकार इलाही जमादार यांना जो प्रश्न पडतो तो खरा असल्याची खात्री पटू लागली आहे. इलाही म्हणतात की माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? काल औरंगाबाद शहरात भटकणार्‍यांना हटकले म्हणून पोलिसाच्याच काठीने पोलिसाला बेदम मारहाण झाली हा व्हिडीओ काल बातम्यांमध्ये व्हायरल झाला आहे.

कायदा हातात घेऊन कायद्याच्या रक्षकांना मारहाण केली जात आहे. सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडविणारे कोण आहेत? उद्या जर महामारीने उग्र रूप धारण केले तर त्याची किंमत समाजालाच चुकवावी लागणार आहे. समाजाच्या भल्यासाठी हे नियम असतांना त्याचे उल्लंघन का केले जात आहे. शब ए बारात निमित्त जमावबंदी लागू केली आहे त्याचेही काटेकोर पालन व्हायला हवे.

- Advertisement -

अमेरिका, रशिया, जपान, स्पेन, इटली आणि स्तर देशातील परिस्थिती आणि भारतात सुरू असलेले उपाय याचे चित्रण इले. माध्यमातून आणि वृत्तपत्रातून पहात आहोत. अशा कठीण प्रसंगात गरज आहे ती संयम, सामंजस्य आणि समन्वयाची.

पण अजूनही काही लोक शासनाच्या विरुद्ध जाऊन काय साध्य करू पाहत आहे हे त्यांनाच ठाऊक. चार दिवसांनी संचारबंदी संपेल की वाढेल हे अद्याप निश्चित नसले तरी जनतेने मात्र संयम बाळगणे महत्वाचे आहे. महामारी अजून पूर्णपणे संपली नसून काही दिवस तरी गर्दी टाळणे, विनाकारण नभटकता आपणच आपली काळजी घेणे हाच कोरोनाला हरविण्याचा मंत्र प्रत्येकाने अंगिकरायला हवा.

- Advertisment -

ताज्या बातम्या