Sunday, July 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! २०२६ मध्ये घेण्यात आलेली NEET ची परीक्षा रद्द; CBI चौकशीचे...

मोठी बातमी! २०२६ मध्ये घेण्यात आलेली NEET ची परीक्षा रद्द; CBI चौकशीचे आदेश

नवी दिल्ली | New Delhi

यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा (Neet Exam 2026) घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेचा पेपर फुटला होता. त्यामुळे आता केंद्र सरकारने (Central Government) ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता.

- Advertisement -

नीटचा पेपर फुटल्यानंतर सीबीआयकडून (CBI) चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील संबधित दोषींवर कारवाई केली जाणार आहे. ३ मे रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र, अद्याप या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. राजस्थानमध्ये नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर काही प्रकरणेही पुढे आली होती. त्यानंतर आता सीबीआयने थेट परीक्षा रद्द करण्याचा आदेश जारी केला.

दरम्यान, देशातील (Country) सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे रोजी नीटची परीक्षा दिली होती. यात महाराष्ट्रातील (Maharashtra) जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचा (Student) समावेश होता. मात्र, देशभरात ४२ तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून हा परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार

गेल्या आठवड्यात म्हणजे दि.०३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, पेपरफुटीमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र ३ मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. तसेच विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही. मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी,पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.

रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट

२८१ प्रश्न असलेल्या guess paper मधील १३१ प्रश्न जसेच्या तसे NEET च्या प्रश्नपत्रिकेत येत असतील तर २०२४ प्रमाणे यंदा देखील परीक्षेत पैशांचा मोठा खेळ झाला हे स्पष्ट आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात देखील असाच प्रकार SRPF परीक्षेच्या संदर्भात देखील झाला होता. ठराविक दलालांच्या पैशाच्या खेळात विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणं योग्य नाही. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करावी, ही विनंती, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : कंपनीचा सर्व्हर हॅक करून 37.56 लाखांची फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका खासगी कंपनीचा सर्व्हर हॅक करून तब्बल 37 लाख 56 हजार 512 रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना...