जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
जामखेड-माहीजळगाव राष्ट्रीय महामार्ग (Jamkhed-Mahijalgaon National Highway) क्रमांक 548-डी वरील जामखेड तालुक्यातील पाटोदा (Patoda) (गरडाचे) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोन शासकीय कर्मचार्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित रस्त्याचे काम करणार्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (एमएच 14 बीजे 2283) आणि हुंडाई वेन्यू कार (एमएच 20 जीई 3562) या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात श्रीगोंदा (Shrigonda) तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक विकील बहुरे आणि कुकडी पाटबंधारे उपविभाग करमाळा (Karmala) येथील मोजणीदार रामचंद्र बहुरे यांचा जागीच मृत्यू (Government Employees Death) झाला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाटोदा-रत्नापूर परिसरात रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे एका बाजूचा रस्ता बंद करून केवळ एका लेनवरून वाहतूक सुरू होती. याच ठिकाणी भरधाव वेगातील दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात (Accident) घडला.
घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेचे चालक महेश मोहळकर पहाटे सुमारे चारच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच तहसीलदार धनंजय बांगर यांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण इंगळे करत आहेत.




