Friday, May 3, 2024
Homeनाशिकपालकांनो सावधान! आठ महिन्यांच्या चिमुरड्याने गिळले नेलकटर

पालकांनो सावधान! आठ महिन्यांच्या चिमुरड्याने गिळले नेलकटर

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

येथील के जे मेहता परिसरात राहणाऱ्या एका कुटंबातील आठ महिन्यांच्या चिमुरड्याने नेलकटर गिळल्याचा प्रकार घडला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी के जे मेहता परिसरातील शिंदे कुटंबातील आठ महिन्यांचे बाळ खेळत असताना त्याची हाती लागलेले नेलकटर त्याने गिळले. काही वेळाने बाळाला त्रास होत असल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले.

माजी नगरसेवक बंटी तिदमे शिंदे गटात, मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

बाळाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर बाळाला आडगाव येथील मविप्रच्या वैद्यकीय रुग्णालयात हलवले.

सोमवारी रात्री उशिरापर्यंत बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळाला कुठलीही शारीरिक इजा ना होता नेलकटर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आता बाळ सुखरूप आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या