Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Khadse: आयुष्यात एकही गुन्हा दाखल नाही, त्यांच्याकडे कोणताही अमली पदार्थ सापडला...

Eknath Khadse: आयुष्यात एकही गुन्हा दाखल नाही, त्यांच्याकडे कोणताही अमली पदार्थ सापडला नाही, मग…?एकनाथ खडसेंचे पुणे पोलिसांना प्रश्न

पुणे | Pune
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावर राजकारण चांगलेच तापले आहे. रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर सह सर्व आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता स्वत: एकनाथ खडसे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मी आयुष्यात कधीच ड्रग्स घेतले नाहीय, असे मला माझ्या जावयाने सांगितल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. पोलीस आधीपासुन प्रांजल खेवलकरांवर पाळत ठेऊन होते, असा आरोपही एकनाथ खडसेंनी केला.

नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?
एकनाथ खडसे म्हणाले की, प्रांजल खेवलकरांवर आयुष्यात एकही गुन्हा दाखल नाही. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही. ते वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. अमली पदार्थ एका मुलीच्या पर्समध्ये सापडला आहे आणि तो कसा आला हे तिला पण माहिती नाही. तिला आरोपी नंबर एक बनवले पाहिजे होते आणि इतरांना साक्षीदार पण तसे झाले नाही. प्रांजल खेवलकरांकडे कोणताही अमली पदार्थ सापडला नाही. माझ्या जावयाने मला सांगितले की, माझी पाळत ठेवली जात होती. सिव्हिल कपड्यांमध्ये पोलिस पाळत ठेवत असल्याचाही गंभीर आरोप खडसे यांनी म्हटले.

- Advertisement -

पोलिसांना माझे काही प्रश्न आहेत. संगीत नाही, गोंधळ नाही, रेव्ह पार्टी कसे म्हणता. रेव्ह पार्टी म्हणजे काय? व्याख्या माहिती आहे का? पोलिसांनी जी कारवाई केली त्याचे व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून समोर आले. प्रायव्हेट लाईफचे व्हिडीओ का शेअर केले? पोलिसांना हे अधिकार आहेत का? याला जर रेव्ह पार्टी म्हणायचे असेल तर राज्यात कुठेही कोणीही घरात पाच-सात जण पार्टीला बसले तर त्याला रेव्ह पार्टी म्हणावे लागेल. मला पोलिसांना रेव्ह पार्टीची व्याख्या विचारायची आहे. रेव्ह पार्टी सांगून पोलिसांनी बदनामी करण्याचे काय प्रयोजन होते, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

YouTube video player

प्रांजल खेवलकर याच्याकडे कोणताही अमली पदार्थ सापडला नाहीये. व्हिडीओमध्ये तो बाजूला उभा स्पष्टपणे दिसत आहे. काहीही झाले तरीही या प्रकरणातील सत्य बाहेर येईल. हे सर्व ठरवून केल्याचे म्हणण्यास वाव आहे. रेव्ह पार्टी म्हणून बदनाम करण्याचा का प्रयत्न केला जात आहे?, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट बाहेर कसा आला?
काल मला कळाले की, दोन जणांच्या रक्तात अल्कोहोल सापडले. हा रिपोर्ट बाहेर कसा आला? डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल तर तो पोलिसांकडे येतो. तो मीडियाकडे कसा आला? मग अजून ड्रग्जचा रिपोर्ट का येत नाही? मला संशय घ्यायला जागा आहे की, ड्रग्ज रिपोर्टबाबत छेडछाड होण्याचा प्रयत्न असावा. कारण अशा प्रकारांमध्ये ससून रुग्णालयाचे नाव अग्रेसर आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलण्यात आले. दोन डॉक्टर जेलमध्ये आहेत. मग पुणे पोलीस याप्रकरणात ड्रग्जचा अहवालात छेडछाड करण्याचा प्रयत्न करत नाहीत ना? अल्कोहोल दोघांनी घेतल्याचे नावे येत, प्रांजल खेवलकरांचे नाव आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

वेस्टिन हॉटेलमध्ये पोलिस आले तिथल्या पार्किंगमधील सीसीटीव्हीत पोलिस दिसत आले. हा प्रकार संशयास्पद आहे. प्रफुल लोढा हनी ट्रॅपमध्ये सरकार तत्परता घेऊन माहिती का नाही देत? नाशिकमध्ये हनी ट्रॅप गवगवा केला. खडसे कसे बदनाम होतील असा प्लॅन केला जातोय.’

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime : गोल्ड डिलिव्हरीत दहा लाखांचा ‘झोल’; नामांकित सराफा उद्योगाकडून...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik मुंबईतील नामांकित 'मलबार गोल्ड अँन्ड डायमंड' ने नाशिकमधील (Nashik) एका कुरिअर कार्यालयाकडे पाठविलेले दहा लाखांचे गोल्ड कॉइन 'डिलिव्हरी' दरम्यान संशयास्पदरित्या...