Wednesday, September 30, 2026
HomeनगरSangamner : रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी संगमनेरच्या दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sangamner : रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी संगमनेरच्या दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

येथील सोनांबेकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या कारणावरुन संगमनेर शहर पोलिसांत दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पिंपळगाव निपाणी (ता.अकोले) येथील मंगल दत्तात्रेय दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचे पती दत्तात्रेय यांना गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी रोजी छातीत वेदना होवू लागल्याने संगमनेरातील एका डॉक्टरांकडे दाखवले. तेव्हा रक्ताच्या तपासण्या केल्या असता लालपेशी व क्रिएटिन सामान्य होते.

- Advertisement -

त्यानंतर दुसर्‍या दिवशी सोनांबेकर हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत कोरडे यांनी सर्व तपासणी अहवाल पाहून स्टेंट टाकण्याचा सल्ला दिला. मात्र, 1 मार्च रोजी मध्यरात्री तत्काळ डॉ. कोरडे यांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर रुग्णाच्या हाताला गँगरीन झाल्याचे डॉक्टरांनी मान्य करत रुग्ण व्यवस्थित असल्याचेही मंगल दळवी यांना सांगितले. यानंतर धक्कादायक म्हणजे दुसर्‍या दिवशी डॉक्टरांनी काहीएक न विचारता रुग्णाचे रक्त घेतले आणि अहवाल आल्यानंतर क्रिएटिन 4.91 वर गेल्याची माहिती दिली. अशावेळी यूरॉलॉजिस्ट किंवा नेफ्रॉलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक असताना केवळ खूप खर्च येणार आहे तुम्ही पैशांची व्यवस्था करा, नाहीतर रुग्णाला हलवा असे सांगून दोन्ही डॉक्टर तिथून निघून गेले.

त्यानंतर 3 मार्चला नाशिक येथील एका रुग्णालयात दाखल केले असता महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा संपूर्ण लाभ सोनांबेकर हॉस्पिटलने घेतल्याचे उघड झाले. शेवटी घोटी येथे रुग्णाला हलवले. तेव्हा रुग्णाच्या किडन्या निकामी झाल्याचे तपासणीतून समोर आले आणि 22 मार्च, 2025 रोजी रुग्ण दत्तात्रेय दळवी यांचे निधन झाले. याबाबत योजनेच्या तक्रार निवारण अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी समिती नेमून समितीने सोनांबेकर हॉस्पिटल व्यवस्थापन व डॉ. अभिजीत कोरडे हे सदर रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे निश्चित करत त्यानुसार मंगल दळवी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन डॉ. अभिजीत भाऊसाहेब कोरडे व डॉ. अजिंक्य अशोक सोनांबेकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे करत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये; राज्य शिक्षण...

0
मुंबई | Mumbai राज्यातील दुष्काळग्रस्त (Drought) २६५ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक...