Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिंडोरी तालुक्यावर शोककळा : वेगवेगळ्या घटनेत पाच बालकांचा दुदैवी मृत्यू

दिंडोरी तालुक्यावर शोककळा : वेगवेगळ्या घटनेत पाच बालकांचा दुदैवी मृत्यू

- Advertisement -

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी शहरात नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू होण्यास आज पाच दिवसही पूर्ण होत नाही तोच तालुक्यात पुन्हा एकदा वेगवेगळ्या झालेल्या घटनेत चार बालकांचा पाण्यात बुडून तर एका बालकाचा झोक्याचा फास बसून मृत्यू झाला असून घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

पहिल्या घटनेत खेरवाडी येथे मोहाडीचे दोन मुले ओहळात बुडून झाला. दुसर्‍या घटनेते परमोरी येथील दोघे कादवा नदीत बुडून मृत्यू झाला तर तिसर्‍या घटनेत कादवा म्हाळूंगी येथे झोका बांधत असतांना गळ्याला फास बसून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या तिन्ही घटनेमुळे दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

खेरवाडी ओहळात मोहाडीचे दोघे बुडाले
मोहाडी येथील फटांगडे कुटूंबियाचे खेरवाडी येथे देव नैवद्यांचा कार्यक्रम असतो. त्या निमित्ताने फटांगडे कुटूंबिय खेरवाडी येथे गेले होते. कार्यक्रमाची धामधुम सुरु असतांना रस्त्याच्या बाजूला असलेले ओहळाकडे रुद्र गणेश जाधव व ओमकार सुनील फटांगडे हे दोघे मामे भाऊ, आतेभाऊ खेळण्यास गेले व पाण्यात पडले.

नैवद्य दाखवण्याचा कार्यक्रम सुरु झाला असता दोघे नसल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यांचा शोध घेतला असता ते ओहळातील पाण्यात बुडल्याचे लक्षात आले. त्यांचे शव बाहेर काढण्यात आले. मोहाडी येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघेही आतेभाऊ व मामेभाऊ असल्याने नातेसंबंधापेक्षा मैत्री त्यांची जास्त होती. दोघांच्या निधनामुळे मोहाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

परमोरीचे दोघे कादवा नदीत बुडाले
दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथील दोन लहान मुलांचा कादवा नदी पात्रात बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परमोरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
परमोरी येथील समीर रावसाहेब गांगोडे (14), यश राहुल पगारे ( 12)व अजून एक हे तिघे दुपारच्या सुमारास कादवा नदीवर पोहण्यासाठी गेले असता दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

समीर, यश व त्याचा एक साथीदार दुपारच्या सुमारास कादवा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले. यावेळी त्यांचा मित्र नदीपासून काही अंतरावर होता. मात्र हे दोघे पाण्यामध्ये पोहत असताना यश गटांगळ्या खाताना समीरला दिसले. यावेळी समीर त्याला वाचवण्यासाठी गेला, मात्र दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन्ही विद्यार्थी हे वरखेडा येथील जनता विद्यालयाचे विद्यार्थी होते. यशचे वडील बालपणी मृत्यू पावल्याने यश हा त्याच्या मामा मंगेश अहिरे यांच्याकडे परमोरी येथे शिकण्यासाठी आला होता. तर समीरचे वडील हे परमोरी येथील असून ते आपला उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत आहे.

दरम्यान दोन्ही समीर व यश पाण्यात बुडाल्याचे त्याच्या मित्रांनी गावात येऊन त्याच्या घरच्यांना सांगितले असता त्याच्या घरच्यांनी नदी लागत जाऊन पाण्यात या दोघांना शोधले असता त्यांचे मृतदेह हाती लागले. दरम्यान त्यांचे मृतदेह वणी येथे शवाविच्छेदन करून संध्याकाळच्या सुमारास परमोरी गावांमध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

गळ्याला फास बसून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू
दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळूंगी येथील सुरज हिंम्मत गायकवाड (14) याचा झोक्याचा गळफास बसल्याने मृत्यू झाला. कादवा म्हाळूंगी गावाची यात्रा होती. यात्रेत सकाळी सुरज हा सहभागी झाला. मांडव डहाळ्याच्या कार्यक्रमात नाचला. त्याचे घर गावालगत मळ्यात असल्याने त्याने दुपारी घरी येवून जेवन केले. त्यानंतर तो घराच्या मागील बाजूस आंब्याच्या झाडाखाली गेला. त्याच्याबरोबर इतर लहान मुलेही होती.

आंब्याच्या झाडाला झोका बांधून खेळत असतांना त्याला गळफास बसला. परंतू ही घटना कोणाच्याच लक्षात आले नाही. त्याच्यासोबतचे लहान मुले घरी निघुन आले. त्याचा भाऊ बैलाला पाणी पाजण्यासाठी गेला असता तेव्हा त्याच्या ही घटना लक्षात आली. त्याचा जागेवरच मृत्यू झालेला होता. शवविच्छेदनानंतर त्याच्यावर कादवा म्हाळूंगी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे वडील सिंग्राम कंपनीत कामाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

पालकांनी आपल्या बालकांची काळजी घ्यावी व लक्ष ठेवावे असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती योगेश बर्डे तसेच सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जोंधळे यांनी केले आहे

ताज्या बातम्या

राज-का-रण : पप्पू पास हो गया..

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत'- संपादक काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये...