Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसेंची कोरोना चाचणी निगेटिव्ह

एकनाथ खडसेंची कोरोना चाचणी निगेटिव्ह

नवी दिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती होती. यासंदर्भात खडसेंनी गुरुवारी ट्विटही करुन माहिती दिली होती. मात्र आता त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

- Advertisement -

कोरोनाची लागण झाल्याचे एकनाथ खडसे यांनी गुरुवारी जाहीर केले. त्यानंतर उपचारासाठी ते मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले. मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

एकनाथ खडसे यांची अँटिजेन टेस्ट केली होती. जळगावमध्ये ही टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र यानंतर, सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या फुफुसांत संसर्ग दिसून आला होता. त्यामुळे कोरोनाच्या पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्यात आले होते. त्या ठिकाणी आज त्यांची आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मुंबईतील तपासणीत त्यांचे दोन्हीही रिपोर्ट निगेटिव्ह आले. यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

येवलाच्या आमदाराबाबतही अशाच प्रकार

येवला येथील शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा करोना चाचणीचा अहवाल नाशिकमध्ये पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मुंबईत जाऊन तसासणी केल्यावर हा अहवाल निगेटिव्ह आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या