Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजएकनाथ खडसे यांचा लवकरच पक्ष प्रवेश - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

एकनाथ खडसे यांचा लवकरच पक्ष प्रवेश – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपत प्रवेश देण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. त्यानुसार गणेशोत्सवानंतर खडसे यांचा पक्षप्रवेश लवकरच करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूर येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला होता. खडसे यांच्या घरवापसीसाठी भाजप नेते विनोद तावडे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीत खडसे यांच्या भाजप प्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला होता.

मात्र, लोकसभा निवडणूक होऊन साडेतीन महिने उलटून आणि खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊनही एकनाथ खडसे यांचा अधिकृत भाजप प्रवेश रखडला होता. आपला भाजप प्रवेश देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळे रखडल्याचा आरोप खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता.

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश लवकरच घडवून आणला जाईल,असे स्पष्ट केले. तर भाजपचे जळगाव जिल्ह्यातील नेते गिरीश महाजन यांनी खडसे भाजपमध्ये आल्यास त्यांचे फटाके फोडून स्वागत केले जाईल,असे म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...