Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPranjal Khewalkar : प्रांजल खेवलकर प्रकरणात ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवाल आला समोर, नेमकं...

Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकर प्रकरणात ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवाल आला समोर, नेमकं काय म्हटलंय?

मुंबई | Mumbai

काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या खराडी भागामध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी (Police) छापा टाकला होता. या छप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. तब्बल दीड महिन्यांनी प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यांनतर आता या प्रकरणात खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यात मोठा ट्विस्ट असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, “खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्यासह इतर सहा जणांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले होते. यांनतर आता हा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यात खेवलकर यांच्यासह कुणीही ड्रग्सचे (Drugs) सेवन केले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता हाच रिपोर्ट पोलिसांनी चार्जसीटमध्ये देखील दिले असून, हे रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

YouTube video player

रिपोर्टनंतर एकनाथ खडसे काय म्हणाले?

प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारे ड्रग्सचे सेवन केलेले नाही हे मी आधीपासूनच सांगत होतो. सात जणांची रेव्ह पार्टी होऊ शकत नाही. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना गुन्हे दाखल आहेत, असे दाखवण्यात आले. शेवटी पोलीस म्हणाले ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, या सगळ्या गोष्टी बघता हा रचलेला एक कट आहे असं वाटतं, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...