Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde: …तर म्हणाले असते लायटरने लंका जाळली ; एकनाथ शिंदेंची उध्दव...

Eknath Shinde: …तर म्हणाले असते लायटरने लंका जाळली ; एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर जळजळीत टीका

मुंबई | Mumbai
अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी आणि दान चोरी प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ५ जुलै रोजी रामरक्षा आंदोलन करण्यात आले. दादरच्या हनुमान मंदिरात रामरक्षा स्तोत्र पठण आणि हनुमान चालीसा म्हणत हे आंदोलन करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी ‘हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती, ती मशाल आज आमच्या हातात आहे.’ दरम्यान, रामरक्षा आंदोलनावर आणि उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेत २९३ प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका सविस्तर मांडली. राज्यातील पावसाची परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, आषाढी वारीची तयारी, मुंबईतील पायाभूत सुविधा आणि विरोधकांच्या टीकेला त्यांनी सविस्तर उत्तर दिले.

- Advertisement -

Nashik Crime News: हायवे, ढाब्यावर नशेचा बाजार! गॅस शेगडी रेपेअरिंगच्या आड सुरु होती अफूची विक्री, ५१ किलो बोंडांसह तस्कर गजाआड

त्यांच्या पक्षाची निशाणी लायटर असती तर म्हणाले असते..
विधान परिषदेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, कालपर्यंत राम भक्तांना हरामxx म्हणणारे, आज रामरक्षा म्हणू लागले आहेत. सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम, असा हा प्रकार सुरू आहे. कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. काही लोकांनी आता नवा शोध लावलाय की, हनुमानाने मशालीने लंका जाळली, पण त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती, तर म्हणाले असते लायटरने लंका जाळली. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. आता रामायण सागरला परत ते रामायण सांगायला लावू का? असा प्रश्न उपस्थित करत एकनाथ शिंदे म्हणाले की, मी नेहमी सांगतो ‘जो राम का ना हो सका, वो किसी काम का नहीं.’ त्यामुळे आता त्यांना कळलंय आणि म्हणून ही उपरती सुचलेली आहे. पण हनुमान चालीसा म्हणणाऱ्या आमदार-खासदारांना जेलमध्ये कोणी टाकलं? असा प्रश्न उपस्थित शिंदे पुन्हा म्हणाले की, ‘ऐसे लोगो से रखना दुरी, जिनके मन राम और बगल में छुरी.’

ताज्या बातम्या