Friday, September 4, 2026
Homeक्राईमNashik Crime News: हायवे, ढाब्यावर नशेचा बाजार! गॅस शेगडी रेपेअरिंगच्या आड सुरु...

Nashik Crime News: हायवे, ढाब्यावर नशेचा बाजार! गॅस शेगडी रेपेअरिंगच्या आड सुरु होती अफूची विक्री, ५१ किलो बोंडांसह तस्कर गजाआड

​नाशिक । प्रतिनिधी
शहराला नशामुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने सुरू असलेल्या मोहिमेला यश आले आहे. गॅस शेगडी रिपेअरिंगच्या व्यवसायाचा आडोसा घेऊन शहरात छुप्या पद्धतीने अफूच्या बोंडांची (डोडा व भुगा) विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने (गुन्हे शाखा) बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisement -

पेठ रोडवरील दत्तनगर भागात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५१ किलो ७३ ग्रॅम वजनाचा डोडा जप्त केला असून, त्याची बाजारपेठेतील किंमत आणि इतर मुद्देमालासह एकूण ८ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. या प्रकरणी संशयित सुभाष मंगलाराम बिष्णोई (वय ४२, रा. जोधपूर, राजस्थान; सध्या रा. दत्तनगर, पंचवटी) याला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या तपासात या नशेच्या बाजाराचे अर्थकारणही समोर आले आहे.

घटना कशी उघडकीस आली?
संशयित बिष्णोई हा राजस्थानमधून मालवाहू ट्रक चालकांकडून हा माल अत्यंत स्वस्त दरात मागवून घेत होता. त्यानंतर नाशिकमध्ये त्याचे लहान-लहान पॅकेट्स तयार करुन १०० ग्रॅमच्या एका पुडीसाठी ५०० रुपये आकारत होता. म्हणजेच ५ हजार रुपये किलो दराने या अंमली पदार्थाची छुप्या बाजारपेठेत सर्रास विक्री सुरू होती. निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, या नशेचा मुख्य ग्राहक हा ‘लाँग रूट’वर धावणाऱ्या अवजड कंटेनर आणि ट्रकचे चालक आहेत. अनेक दिवस सलग आणि रात्रीच्या वेळी न झोपता गाडी चालवावी लागत असल्यामुळे, हे चालक थकवा, अंगदुखी घालवण्यासाठी आणि झोप उडवण्यासाठी या ‘डोडा’ (अफूची बोंडे) या अंमली पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन करतात, असे समोर आले आहे. बिष्णोई गेल्या १० वर्षांपासून पंचवटी परिसरात गॅस रिपेअरिंगचे काम करत असल्याने त्याला नाशिक शहराचा अभ्यास आहे. याचाच गैरफायदा घेत त्याने मुंबई-आग्रा महामार्गावरील तसेच पेठ रस्त्यावरील ढाबे, हॉटेल्स आणि पंक्चर काढण्याच्या दुकानांच्या आसपास आपले जाळे विणले होते. ढाब्यांवर थांबणाऱ्या ट्रक चालकांशी संपर्क साधून तो या नशेची डिलिव्हरी देत होता, असे उघड झाले आहे.

Crime News: क्लॉड मायथॉसच्या रुपाने बँकिंग, युपीआयपुढे मोठं आव्हान! कंपन्यांना एआयचा कोट्यावधींचा फटका

अशी झाली छापा कारवाई
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, उपनिरीक्षक रंजन बेंडाळे कर्तव्य करत असताना ८ जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. यानंतर, एनडीपीएस पथकाने पंचवटी पोलिसांच्या मदतीने घराची झडती घेतली असता, घरातून ५१ किलो ७३ ग्रॅम वजनाचा डोडा (पाच लाख ६६ हजार रुपये) आणि इतर मुद्देमाल मिळून आला.

​-गॅस शेगडी रिपेअरिंगच्या आडून नशेचा
-५१ किलो अफूच्या बोंडांसह तस्कर गजाआड
-१०० ग्रॅमची पुडी ५०० रुपयांना विक्री.
-हायवेवरील ढाबे आणि हॉटेल्सवर छुप्या डिलिव्हरी.
-लाँग रूटचे ट्रकचालक होते मुख्य ग्राहक
-राजस्थातून नाशकात अफूचा सप्लाय

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...