मुंबई | Mumbai
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले, तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभेत मिळालेल्या मोठ्या यशानंतर महायुतीकडून राज्यात सरकार स्थापनेच्या दिशेने पावलं टाकण्यात येत आहेत. पण निकालानंतर आठ दिवस झाले तरीही महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचाली सुरु आहेत. यातच मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा तिढा वाढत असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला
दुसरीकडे मुख्यमंत्रीपद मिळत नसल्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्रीपद (CM Post) मिळत नसल्याने शिंदे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याबाबत आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना भाष्य केले आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : CM पदाच्या चर्चेत ट्विस्ट; फडणवीसांच्या निकटवर्तीयाचे नाव आले समोर
एकनाथ शिंदे यांना मध्यम प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्रिपदासाठी (Deputy Chief Minister) श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा आहे? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “अजून चर्चा सुरु आहेत. तुम्हीच (माध्यमात) चर्चा करत असतात. तुमच्या (माध्यमाच्या) चर्चा जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो की या सर्व चर्चा आहेत. आमची अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाली. यानंतर आता आमच्या तिघांमध्ये (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार) एक बैठक होईल. या बैठकीत आमची साधक बाधक चर्चा होईल”, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : EVM हॅकींगच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की,” ही निवडणूक महायुतीने प्रचंड मतांनी जिंकली.जनतेच्या मनातील सरकार आता स्थापन होईल. गेल्या अडीच वर्षांची आमच्या विकासकामांची ही पोच पावती आहे. जे प्रकल्प मागील अडीच वर्षांपूर्वी थांबवले होते, ते वेगाने सुरू केले आहेत. यापूर्वीच्या सरकारने जेवढ्या योजना राबवल्या त्यापेक्षा सर्वात जास्त योजना आम्ही राज्यात सुरू केल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात या योजना सुवर्ण अक्षरात लिहिल्या जातील, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही संभ्रम नको म्हणून मी मागच्याच आठवड्यात पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.