Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : EVM हॅकींगच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Maharashtra Politics : EVM हॅकींगच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

नेमकं काय म्हटलं?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhansabha Election) निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळाले तर महाविकास आघाडीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. अनेक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी, निकालानंतर उमेदवारांना मिळालेली मतं शेअर करत ईव्हीएममध्ये घोळ असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ईव्हीएम हॅक करण्यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये व्हिडिओ कॉलिंगद्वारे एका व्यक्तीशी ईव्हीएम (EVM) हॅकिंगच्या मुद्द्यावरुन चर्चा केली जात असल्याचे दिसून येते. त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला

या व्हिडीओमध्ये अमेरिकन हॅकर सैयद शुजा (Syed Shuja) असल्याचा दावा केला जात आहे. तो कोणाच्याही बाजुने निवडणूक निकाल लावू शकत असल्याचा दावा करत आहे. त्यासाठी त्याला व्हीव्हीपॅट मशिनचे (VVPAT) नंबर मला हवेत, हे नंबर रिटेरिंग ऑफिसर देईल, असे तो व्हिडीओत म्हणत आहे. तसेच ईव्हीएम मशीन बंद असतानाही त्याचे ट्रान्समिशन करता येत असल्याचा दावा त्याने केला आहे. तर या हॅकिंगसाठी त्याने ५४ कोटी रुपयांची मागणी केल्याचे व्हिडिओत ऐकायला मिळत आहे.

सदर व्हिडीओवर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) स्पष्टीकरण देतांना म्हटले की, व्हिडीओमध्ये केलेला दावा निराधार, खोटा आणि अप्रमाणित आहेत. मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) या व्हिडिओतील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ईव्हीएम ही टँपरफ्रूफ आहे, नेटवर्कसोबत ती जोडली जाऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : CM पदाच्या चर्चेत ट्विस्ट; फडणवीसांच्या निकटवर्तीयाचे नाव आले समोर

दरम्यान, व्हिडीओतील (Video) व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८/४ अन्वये आयटी अॅक्ट २००० च्या कलम ४३ (ग) आणि कलम ६६ (घ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे,सर्वोच्च न्यायालयाने देखील ईव्हीएमवर विश्वास दर्शवला आहे. तसेच २०१९ मध्येही अशाच प्रकारचा दावा केल्याने दिल्लीत या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...