Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde: नाराजीच्या चर्च्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अपेक्षा ठेवणे, मागणी करणे...

Eknath Shinde: नाराजीच्या चर्च्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अपेक्षा ठेवणे, मागणी करणे यात काही चुकीचे नाही…

सातारा | Satara
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता असल्याच्या चर्चा आहे. कारण नाशिकमधून शिवसेनेचे दादा भुसे तर रायगडमधून भरत गोगावले हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. रायगडचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिवसेना नेते भरत गोगावले यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पालकमंत्रीबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात पालकमंत्रीपदाचे वाटप झाल्यानंतर भाजपच्या गिरीश महाजन आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याने शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. मात्र त्याचवेळी आमच्या मंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवणे, मागणी करणे यात काही चुकीचे नाही. महायुतीमध्ये चर्चा करुन मार्ग काढू” असे म्हंटले आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे हे अचानक दरे या त्यांच्या मूळ गावी पोहोचल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. याबाबत बोलताना शिंदे यांनी म्हटले की, “मी नाराज झाल्याच्या बातम्या चालवल्या जात आहे, पण तुम्हीच बघत आहेत की मी तर काम करतोय. मी गावी आलो की लगेच तुम्ही म्हणता मी नाराज आहे. नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट आपण हाती घेतलाय. हा प्रोजेक्ट मोठा असल्याने मला वारंवार गावी यावे लागणार आहे. प्रतापगडापासून ते पाटणपर्यंत हा मोठा परिसर आहे. २३५ गावे अंतर्भुत आहेत. २९५ गावांनी आणखी मागणी केली आहे. पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी जी कामे करायची आहेत ती भुमीपूत्र म्हणून घ्यावी लागतील”.

दरम्यान, नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली असून त्यावर लवकरच तोडगा निघेल असेही एकनाथ शिंदेंनी म्हंटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या