Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर ‘या’ दिवशी सुनावणी

शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर ‘या’ दिवशी सुनावणी

मुंबई | Mumbai

शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्वाधिकार देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेत ठाकरे गटाची याचिका फेटाळली होती. या निर्णयामुळे धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह शिंदे गटाचे की उद्धव ठाकरे याचा निर्णय सर्वतोपरी निवडणूक आयोगाकडे गेला आहे.

- Advertisement -

आता निवडणूक आयोगात १२ डिसेंबर २०२२ ला ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर ठाकरे गट आणि शिंदे गट हे समोरासमोर युक्तिवाद करणार आहेत.

दोन्ही गटांचे वकील हे निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे एकिकडे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना दुसरीकडे आता निवडणूक आयोगासमोरही शिवसेनेच्या चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्ह गोठवलं. त्यानंतर दोन्ही पक्षांना नावं आणि चिन्ह देण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या