Friday, May 3, 2024
Homeनाशिककचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक मोटारसायकल

कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक मोटारसायकल

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

पिंपळगाव शहराचा (pimpalgaon city) विस्तार दिवसागणिक वाढत असतांना शहरातील जुन्या अरूंद गल्ल्यातील कचरा संकलनासाठी (Garbage collection) ग्रामपालिकेने दीड लाख रु. खर्च करून दोन नविन इलेक्ट्रिक मोटारसायकल (Electric Bike) खरेदी केल्या आहे. याद्वारे गल्लीबोळातील कचरा संकलनास मोठी मदत होवून स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

- Advertisement -

येथील ग्रामपालिकेने ग्रामस्वच्छतेच्या बाबतीत सातत्याने दक्ष राहण्याचा प्रयत्न करते आहे. माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रात (maharashtra) प्रथम स्थान मिळाल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता (Solid waste management and sanitation) यासंदर्भात एक वेगळा आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रामपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले.

स्वच्छ पिंपळगाव व सुंदर पिंपळगाव ही संकल्पना साकार करण्यासाठी गेली तीन-चार वर्षापासून ग्रामपालिका विविध उपक्रमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करताना दिसत आहे. गावाची वाढती लोकसंख्या, उपनगरांमध्ये वाढत जाणारी निवासी वस्ती यामुळे गावाचा पसारा वाढतो आहे. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न व्यापक रूप धारण करतो आहे.

गावातील जुन्या अरुंद गल्ल्यांमधील कचरा संकलन कामात मोठा व्यत्यय येत होता. त्यासाठी नुकत्याच नवीन दोन इलेक्ट्रिक मोटर सायकल्स सरपंच अलका बनकर यांच्या हस्ते स्वच्छता ताफ्यात समाविष्ठ करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने स्थानिक निधीतून दीड लाख रुपये खर्च करून कचरा संकलन करणार्‍या इलेक्ट्रिक बाईक (Electric bike) खरेदी केल्या आहे. मोठ्या रस्त्यावर कचरा संकलनासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु जुन्या गावातील अरुंद गल्ली-बोळामध्ये घंटागाडी जाणे अशक्य असल्याने ग्रामपालिका सदस्य गणेश बनकर यांच्या संकल्पनेतून पिंपळगाव ग्रामपालिकेने या इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध करून दिल्या आहेत.

इलेक्ट्रिक दुचाकीच्या सहाय्याने कचरा संकलनाच्या कामाला आता वेग येणार आहे. काल ग्रामपालिकेच्या आवारात या दोन्ही मोटरसायकलचे विधिवत पूजन करून ग्रामपालिकेच्या स्वच्छ व सुंदर पिंपळगाव या संकल्पनेला आकार देण्यासाठी या मोटर सायकलची सुरुवात झाली. यावेळी ग्रामपालिकेच्या विद्यमान महिला सरपंच अलका बनकर, माजी संचालक विश्वास मोरे,

ग्रामपालिका सदस्य सुहास मोरे, संजय मोरे, किरण गवडे, दीपक विधाते, दीपक मोरे, सुरेश गायकवाड, अंकुश वराडे, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळा बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदींसह ग्रामपालिकेचे सेवक व कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपालिकेने राबविलेल्या या उपक्रमाचे शहरातील महिला व पुरुषांनी स्वागत करत ग्रामपालिकेचे आभार मानले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या